EPF Interest : कोट्यवधी नोकरदार लोकांसाठी मोठी बातमी, खात्यात ईपीएफचे व्याज आले, लगेच चेक करा

PF Interest Credited: सणासुदीपूर्वी EPFOने देशातील करोडो लोकांना मोठी भेट दिली आहे. 

Updated: Oct 20, 2021, 09:01 AM IST
EPF Interest : कोट्यवधी नोकरदार लोकांसाठी मोठी बातमी, खात्यात ईपीएफचे व्याज आले, लगेच चेक करा  title=
संग्रहित छाया

मुंबई : EPF Interest Credited: सणासुदीपूर्वी EPFOने देशातील करोडो लोकांना भेट दिली आहे. देशातील 6.5 कोटी नोकरदार लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO ने तुमच्या खात्यात 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज जमा केले आहे. सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षात 8.5 टक्के दराने व्याज हस्तांतरित केले आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यातील शिल्लक (EPF Balance) त्वरित तपासावे की तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही. तुम्ही फक्त एका एसएमएस आणि फोनवरून मिस्ड कॉलद्वारे केंद्र सरकारकडून तुमच्या खात्यात किती पैसे हस्तांतरित केले आहेत, हे तपासू शकता.  (How to check PF Balance) पीएफ खात्यातील शिल्लक कसे तपासायचे ते पाहा.

या क्रमांकावर मेसेज पाठवा 

जर तुम्हाला एसएमएसद्वारे शिल्लक तपासायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला 7738299899 वर EPFOHO UAN ENG वर लिहून पाठवावे लागेल. शेवटची 3 अक्षरे भाषेनुसार असतात. त्याचवेळी, जर तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. तुम्हाला यूएएन वर नोंदणी केलेल्या क्रमांकावरून एसएमएस करावा लागेल. यानंतरच तुम्हाला बॅलन्सचा मेसेज  (EPF Balance) मिळेल. तुम्हाला ही सुविधा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली आदी भाषांमध्ये उपलब्ध आहे.

मिस्ड कॉलद्वारे शिल्लक तपासा

जर तुम्हाला मिस्ड कॉलद्वारे शिल्लक तपासायचे  (EPF Balance) असेल, तर यासाठी तुम्हाला ईपीएफओवरील नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर फक्त एक मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर शिल्लक संदेश तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल. हा संदेश तुम्हाला AM-EPFOHO कडून येईल.

'उमंग'द्वारे देखील तपासू शकता Balance 

या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची शिल्लक  (EPF Balance) उमंग अ‍ॅपद्वारे शोधू शकता. तुमच्या खात्यात किती व्याज हस्तांतरित केले गेले आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनवर उमंग अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल. यानंतर, प्रथम सदस्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यूएएन क्रमांक आणि संकेतशब्द प्रविष्ट करा.

वेबसाइटवरून शिल्लक देखील तपासू शकता

याशिवाय, तुम्ही EPF च्या अधिकृत वेबसाईटद्वारे EPF खात्याची शिल्लक देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला वेबसाइटच्या वरच्या उजव्या बाजूला ई-पासबुकची लिंक मिळेल. आता भविष्य निधी खातेधारकाला यूएएन क्रमांक आणि त्याचा पासवर्ड टाकावा लागेल. यानंतर, वेबसाइटवर यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर, पासबुक वर क्लिक करा आणि तुम्हाला शिल्लक  (EPF Balance) कळेल.