मुंबई : रेशनकार्ड असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. कारण 26 जानेवारी म्हणजे बुधवारपासून तुम्हाला यावर सुविधा दिल्या जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने रेशनकार्डवर सर्वसामान्य, गरीब आणि गरजूंना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. परंतु आतापासून यावर स्वस्त पेट्रोलची सुविधा मिळणार आहे. या सुविधेचा लाभ कोणत्या लोकांना मिळणार हे आधी जाणून घ्या
देशातील अनेक राज्यांमध्ये रेशनकार्डवर विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आज झारखंड सरकारने राज्यातील सुमारे 20 लाख लोकांना रेशन कार्डवर स्वस्त पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ही विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे.
झारखंड राज्यात सरकारने पेट्रोल सबसिडी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त पेट्रोल सबसिडी योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 20 लाख लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
लाल, पिवळा आणि हिरवा शिधापत्रिकाधारकांना पेट्रोल सबसिडी योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ज्यांच्याकडे झारखंड राज्य नोंदणीचे दुचाकी वाहन आहे. ते त्याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या लाभांपैकी प्रत्येक महिन्याला 250 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. हे लक्षात घ्या की, पेट्रोल खरेदी करताना तुम्हाला पंपावर पूर्ण रक्कम भरावी लागेल आणि महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यात 250 रुपये ट्रान्सफर केले जातील.
पेट्रोल सबसिडी योजनेंतर्गत प्रत्येक सदस्याला महिन्याला 10 लिटर पेट्रोलवर 25 रुपये सबसिडी दिली जाईल. अशा प्रकारे, प्रत्येक महिन्याला 250 रुपये थेट तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतील.