तोडगा नाहीच, सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ४ जानेवारीला पुन्हा बैठक

नवीन कृषी कायद्यांवर आजच्या बैठकीतही तोडगा निघाला नाही.

Updated: Dec 30, 2020, 09:58 PM IST
तोडगा नाहीच, सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ४ जानेवारीला पुन्हा बैठक title=

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांवर आजच्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. सरकार आणि शेतकऱ्यांची पुढची बैठक आता ४ जानेवारीला होणार आहे. शेतकरी नेते कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर केंद्र सरकारनंही तिन्ही कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. 

तसंच हमी भावावर कायदा करण्यास असमर्थता दर्शवलीय. त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत समिती स्थापन करणार आहे. दिल्लीतल्या विज्ञान भवनात आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि व्यापार वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची शेतकरी नेत्यांबरोबर बैठक झाली. 

आज झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आणलेल्या जेवणाचा मंत्र्यांनी आस्वाद घेतला. तर शेतकऱ्यांनीही आज सरकारनं दिलेला चहा घेतला.