मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या ३ दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार

सुरक्षा दलांची दक्षता आणि गुप्तचर यंत्रणेने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे.

Updated: Dec 30, 2020, 06:46 PM IST
मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या ३ दहशतवाद्यांना जवानांनी केलं ठार title=

श्रीनगर : सुरक्षा दलांची दक्षता आणि गुप्तचर यंत्रणेने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. श्रीनगर-बारामुला येथे मोठ्या हल्ल्याची योजना आखत असलेल्या तीन दहशतवाद्यांना 16 तास चाललेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी ठार केले. 26 जानेवारीपूर्वी दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहेत.

बुधवारी श्रीनगरमध्ये चकमक संपल्यानंतर पत्रकारांना संबोधित करताना लष्करी अधिकारी म्हणाले की, 'हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत आणि त्यांची ओळख काय आहे. याचा तपास सुरु आहे.'

साही म्हणाले की, 'गेल्या एका आठवड्यात उत्तर काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा एजन्सींकडून माहिती मिळाली होती की दहशतवादी श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नव्हे तर महामार्गालगतच्या भागातही अनेक दहशतवादी दिसले आहेत. या माहितीनंतरच आम्ही आमच्या सिस्टम सक्रिय केल्या.'

श्रीनगर-बारामुला महामार्गावरील एचएमटी परिसरातील लवेपोरा भागातील नुरा रुग्णालयाच्या अगदी समोर असलेल्या घरात मंगळवारी संध्याकाळी दोन ते तीन दहशतवादी दिसल्याची माहिती आमच्या सूत्रांकडून मिळाली. याची माहिती मिळताच 2 आरआर बटालियन, पोलीस आणि सीआरपीएफ यांची संयुक्त टीम घटनास्थळी पोहोचली.

सुरक्षा दलाने त्यांना शरण जाण्यास सांगितले पण प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड हल्ला ही केला. अंधारामुळे ऑपरेशन बंद करण्यात आले. यावेळी दहशतवाद्यांनी पळ काढू नये म्हणून वेढा मजबूत केला होता. पहिल्या प्रकाशात पुन्हा चकमक सुरू झाली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांविरूद्ध तीव्र गोळीबार केला. परंतु तिन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले.