बँकांकडून का येतोय 456 रुपये बॅलेन्स ठेवण्याचा मॅसेज? जाणून घ्या तुमच्या फायद्याची योजना

Government Insurance Schemes: बँका आणि पोस्ट ऑफिसकडून तुमच्या खात्यावर 456 रुपये बॅलेन्स ठेवा असे मॅसेज येत आहेत. खरं तर हा मॅसेज तुमच्या फायद्याचाच आहे. हा मॅसेज नक्की काय आहे?  हे जाणून घेऊ या

Updated: Jun 16, 2022, 09:47 AM IST
बँकांकडून का येतोय 456 रुपये बॅलेन्स ठेवण्याचा मॅसेज? जाणून घ्या तुमच्या फायद्याची योजना title=

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेचा वार्षिक हप्ता वाढवला आहे. या दोन्ही योजने थेट सर्वसामन्य जनतेशी संबधित आहेत. नुकतेच बँका आणि पोस्ट ऑफिसकडून आपल्या ग्राहकांना खात्यात 456 रुपये बॅलेन्स ठेवावेत असे मॅसेज येत आहेत.

PMJJBY चा प्रीमियममध्ये वाढ

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजने (PMJJBY)अंतर्गत व्यक्तीचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास नॉमिनीला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यासाठी 18 ते 50 वर्ष वयाचे लोकं अर्ज करू शकता. आतापर्यंत या योजनेसाठी 12 रुपये प्रीमियम होता आता तो वाढून 20 रुपये झाला आहे.

PMSBY च्या प्रीमियममध्येही वाढ

योजनेत सहभागी असलेल्या व्यक्ती अपंग झाल्यास 1 लाख रुपये दिले जातात. ज्या व्यक्तींचे वय 18 ते 70 वर्षे आहे. ते या योजनांसाठी अर्ज करू शकता. या योजनेचा प्रिमीयम 330 रुपये होता. तो आता 436 रुपये झाला आहे.

दोन्ही योजनांचे 456 रुपये

केंद्र सरकारने दोन्ही योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. दोन्ही कल्याणकारी योजनांचा प्रीमियम मिळून 456 रुपये होतो. या दोन्ही योजनांचा प्रीमियम जून महिन्यात कापला जातो. यासाठी सर्व बँका आणि पोस्ट ऑफिस आपल्या खातेधारकांना आपल्या खात्यात 456 रुपये बॅलेन्स असावा असे सांगत आहेत.