असंघटीत क्षेत्रातील 38 कोटी कामगार/मजूरांसाठी ई-श्रम पोर्टल सुरू; जाणून घ्या याचे फायदे

 केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरूवारी अंसघठित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल सुरू केले.

Updated: Aug 27, 2021, 07:48 AM IST
असंघटीत क्षेत्रातील 38 कोटी कामगार/मजूरांसाठी ई-श्रम पोर्टल सुरू; जाणून घ्या याचे फायदे title=

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरूवारी अंसघठित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल सुरू केले. पीटीआयच्या वृत्तानुसार या पोर्टलच्या माध्यमातून सरकारचे लक्ष असंघटित क्षेत्रासाठी 38 कोटी कामगारांची नोंदणी करणे आहे. 

देशात प्रथमच अशी नोंदणी
वृत्तानुसार, यादव यांनी म्हटले की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा 38 कोटी असंघटित कामगारांच्या नोंदणीची व्यवस्था बनवली जात आहे. यामाध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाजिक योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगार/मजूरांपर्यंत पोहचवण्यास मदत होणार आहे. ई श्रम पोर्टल वर नोंदणी करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना 2 लाखाचा अपघात विमादेखील मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रीने म्हटले आहे की, पोर्टलवर नोंदणी केलेल्या कोणत्याही कामगाराचा अपघातात मृत्यू किंवा शारिरीक अपंगता आल्यास अशा स्थितीत 2 लाख रुपये देण्यात येतील. कामगारांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी टोल फ्री क्रं 14434 जारी करण्यात आला आहे. या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या मजूर/कामगारांना ई श्रम कार्ड जारी करण्यात येईल. यामध्ये 12 अंकी विशेष क्रमांक असणार आहे.