नवी दिल्ली : तुम्ही विमान प्रवास करणार आहात ? किंवा तुम्हाला वारंवार विमान प्रवास करावा लागतोय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता तुम्ही विमानात दारु किंवा नॉन व्हेजचा आनंद घेऊ शकता. विमान प्रवासात ही सेवा आतापर्यंत मिळत नव्हती. पण आता सरकारने विमान प्रवासासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर ( SOP) जाहीर केलीय.
कोरोना संकटकाळामुळे विमान प्रवासावर मोठा परिणाम झालाय. बंद झालेली विमान सेवा पुन्हा सुरु झालीय. डोमेस्टिक विमान प्रवासात प्री पॅक फूड, ड्रिंक्स वैगेरे मिळू शकणार आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे प्रवासी याचा आनंद घेऊ शकतात. दोन्ही उड्डाणांसाठी वेगवेगळ्या एसओपी जाहीर करण्यात आल्यायत.
आता पर्यंत यात्रेदरम्यान मील सर्व्हिस मिळू शकत नव्हती. पाण्याची बॉटल गॅलरी किंवा सीटजवळ दिली जायची. फ्लाईटच्या आत काही खाऊ शकत नाही.
नव्या एसओपीनंतर एअरलाईन्स प्रीपॅक्ड स्नॅक्स, मील, ड्रिंक्स प्रवाशांना दिले जाईल.
खाण्यापिण्याच्या वस्तू डिस्पॉजेबल प्लेट, कटलरी आणि ग्लासमध्ये मिळतील. याचा पुनर उपयोग करता येणार नाही.
क्रू मेंबर्सनी प्रवाशांना खाणं दिल्यावर त्यांना प्रत्येकवेळी हॅण्डग्लोज बदलावे लागतील.
या दरम्यान प्रवासी यात्री ऑन बोर्ड एंटरटेन्मेंटचा आनंद घेऊ शकतात.
सर्व इयर बर्ड्स आणि हेडफोन सॅनिटाईज करावे लागतील.
सध्याची परिस्थिती पाहता प्रवाशांनी काळजी घेणं महत्वाचे आहे.
कमी किंमतीत सेवा देणाऱ्या एआरलाईन्सना यामुळे फायदा होणार आहे.
यामुळे त्यांना प्रवाशांकडून जास्त पैसे मिळू शकणार आहेत.
प्रवाशांच्या संख्येत वाढ देखील होणार आहे.