बालिकागृहात ३४ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

बालिकागृहात २९ नव्हे तर ३४ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Updated: Jul 28, 2018, 04:18 PM IST
बालिकागृहात ३४ अल्पवयीन मुलींवर बलात्कार  title=

पटना : बिहारच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बालिकागृहात २९ नव्हे तर ३४ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुजफ्फरच्या एसएसपी हरप्रीत कौर यांनी यासंदर्भात माहिती दिली. गेल्या आठवड्यात ४२ मुलींच्या मेडिकल रिपोर्टमधून २९ जणींवर बलात्कार झाल्याचे सांगण्यात येत होते. विरोधी पक्षाच्या दबावात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरूवारी सीबीआय तपासणी करण्याची शिफारस केली होती.

मुंबईच्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या टीमने बालिका गृहात सोशल ऑडिटमध्ये लैंगिक शोषणाचा उल्लेख केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. यानंतर मुजफ्फर पोलीस ठाण्यात यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली. यानंतर मेडिकल रिपोर्टमध्ये ४१ पैकी २९ मुलींवर बलात्कार झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी ब्रजेश ठाकुरसहित १० जणांना अटक करण्यात आलीयं.

सीबीआय तपासाची मागणी 

बिहार सरकारने मुजफ्फरमधील बालिका गृह बलात्कार प्रकरणी सीबीआय तपास करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, पोलीस महानिदेशक आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांना तात्काळ याप्रकरणी तपासाचे आदेश दिलेयत. याप्रकरणाचे गंभीर पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत.