वृद्ध आई-वडिलांचा छळ केल्यास ६ महिने कारावास

जर कोणी वृद्ध त्यांच्या मुले, नातेवाईकांच्या त्रासाला सामोरे जात असतील तर, ते ट्रिब्यूनलमध्ये तक्रार करू शकतात.

Updated: May 12, 2018, 02:46 PM IST
वृद्ध आई-वडिलांचा छळ केल्यास ६ महिने कारावास title=

नवी दिल्ली : कुटुंबियांच्या छळाचा सामना करणाऱ्या पीडित वृद्ध आणि आई-वडीलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. घरातील वृद्धांना, आई-वडीलांना वाईट वागणूक देत गैरवर्तन करणाऱ्या अपत्ये किंवा नातेवाईकांना कायद्यानुसार आता थेट ६ महिन्यांचा कारवास भोगावा लागू शकतो. सध्यास्थितीत अशा प्रकरणांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षेचा कालावधी हा ३ महिन्यांचा आहे. मात्र,  या काद्यात बदल करत शिक्षेचा कालावधी आता वाढविण्याचा प्रस्ताव केंद्रीय नाय आणि सामाजिक अधिकार मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावावर विचार करतना ज्येष्ठ नागरिक अधिकार, कल्याण अधिनियम २००७चा आधार गेत अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, दत्तक अपत्ये, सावत्र मुले, जावई, सून यांनाही या कायद्याच्या कक्षेत आणण्याचा विचार सरकार करत आहे.

वृद्धांची सुरक्षाही महत्त्वाची

केंद्रीय न्याय मंत्रालाच्या माहितीनुसार, नव्या नियमात मुलांकडून दिल्या जाणाऱ्या १० हजार रूपयांच्या भत्ता रकमेची मर्यादाही कमी करण्याचा विचार आहे. प्रस्तावित कायद्यान्वये वृद्ध आई-वडीलांच्या देखभालीचा अर्थ केवळ जेवण, कपडे, घर आणि आरोग्यदायी सुविधा देणे नव्हे. तर, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे हे देखील आहे. 

ट्रिब्यूनलमध्ये करू शकतात तक्रार

दरम्यान, जर कोणी वृद्ध त्यांच्या मुले, नातेवाईकांच्या त्रासाला सामोरे जात असतील तर, ते ट्रिब्यूनलमध्ये तक्रार करू शकतात.