सात नातवंडे असलेल्या आजीबाई 22 वर्षीय तरूणाच्या प्रेमात

प्रेमाला वयाचं बंधन नसतं हेच खरं 

Updated: Jan 24, 2020, 04:53 PM IST
सात नातवंडे असलेल्या आजीबाई 22 वर्षीय तरूणाच्या प्रेमात

मुंबई : प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं. असं म्हणतं सात नातवंडांच्या आजी चक्क प्रेमात पडली आहे. या आजीचं चक्क एका 22 वर्षांच्या मुलावर प्रेम जडलं आहे. कुटुंबातील लोकांनी या लग्नाला परवानगी दिली नाही तर या प्रेमीयुगुलाने चक्क आत्महत्येची धमकी दिली आहे. 

आजीबाईंच्या नवऱ्याने मंगळवारी 7 मुलं आणि 7 नातवंडांसोबत चक्क पोलीस स्टेशन गाठलं आहे. तसेच त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या 22 वर्षांच्या तरूणाच्या पालकांनी देखील त्याचवेळी पोलीस स्टेशन गाठले आहे. 

22 वर्षांच्या तरूणाला जेव्हा त्याच्या या निर्णयाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने वय हे फक्त आकडे आहेत. मला ज्या व्यक्तीसोबत राहायचं आहे त्याच्यासोबत राहण्याचा माझा हक्क आहे. याविरोधात मला कुणीही थांबवू शकत नाही. 

चार मुले आणि तीन मुलांची आई असलेली ही महिला आग्र्याच्या एत्मादौला भागात राहते. त्यांच्या तीन मुले आणि एका मुलीचे लग्नही झाले आहे.या आजीला  ५ नातू आणि २ नाती आहेत. दोन वर्षांपूर्वी या आजीचे शेजारी राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाशी प्रेम जुळले. काही दिवसांनी हे तिच्या पतीला आणि मुलांना समजले. दोघांनाही लग्न करायचे होते. या प्रेमीयुगुलाविरोधात महिलेच्या पती आणि मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली. तिथेही या दोघांनी लग्नावर ठाम असल्याचे सांगितले.

पोलीस निरीक्षक उदयवीरसिंह मलिक यांनी दोघांना समजावलेही. मात्र त्यांनी मान्य केले नाही. या नंतर पोलिसांनी या तरुणाविरोधात शांतता भंग करण्याबाबत कारवाई केली. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने या आजी पती आणि मुलांसोबत घरी गेली.