नवी दिल्ली : आपल्याला वडील आणि आजोबांच्या वारशा हक्कामधून प्रत्येकाला मालमत्ता मिळते. तर काहींच्या वाट्याला चांगले संस्कार येतात. पण राजधानी दिल्लीमध्ये एका कुटुंबाला त्यांच्या पूर्वजांकडून 'जल्लादी'चा वारसा हक्क मिळाला आहे. हे कुटुंब दिल्लीतील मेरठ शहरातलं आहे. शिवाय वारसा हक्क म्हणून जल्लादी मिळालेल्या या कुटुंबाला देशात जल्लादांचे कुटुंब म्हणून देखील ओळखले जाते.
१९५०-६० च्या दशकात जल्लाद म्हणून नोकरी करणारे लक्ष्मन जल्लाद कुटुंबाचे वरिष्ठ आहेत. न्यायालयाद्वारे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अनेक दोषींना त्यांनी फासावर चढवले आहे. पंजोबा लक्ष्मन जल्लाद यांचा नातू पवन जल्लाद आता त्याच्या जीवनातील पहिली फाशी देण्यासाठी सज्ज झाला आहे. पवनच्या वडिलांचे नाव मरहूम जल्लाद असे आहे. तर त्यांच्या आजोबांचे नाव कालू राम जल्लाद असे आहे.
कुटुंबाच्या 'जल्लादी'चा वारसा आता पवन पुढे चालवणार आहे. तो निर्भयाच्या ४ दोषींना फाशी देणार आहे. याआधी पवन यांनी जवळपास ५ दोषींना फाशी देण्यासाठी आपल्या आजोबांची मदत केली होती. त्यांनी त्यांच्या आजोबांकडून यामागचे बारकावे समजून घेतले आहेत. निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकराणातील आरोपींना पवन फाशी देणार आहेत.
सोमवारी आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत आपण देषींना फाशी देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 'मी दोषींना फाशी देण्यासाठी तयार आहे. माझ्यासोबत माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. माझ्या पूर्वजांनी अनेक गुन्हेगारांना फासावर चढवले आहे.' तर पवन त्यांच्या जीवनात एकत्र चार देषींना २२ जानेवारी रोजी फाशी देणार आहे.
न्यायमूर्ती भानुमती आणि न्यायमूर्ती भूषण यंच्या बेंचने आरोपींची पुनर्विचार याचिका १८ डिसेंबर रोजी फेटाळली होती. ज्यानंतर पटियाला हाऊसच्या ट्रायल कोर्टाने चारही आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे.