लग्नाच्य़ा मंडपात पापी पेट का सवाल! नवरा सोडून बॉसला महत्त्व, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा नावाच्या युझरने शेअर केला 

Updated: Sep 17, 2021, 11:09 PM IST
लग्नाच्य़ा मंडपात पापी पेट का सवाल! नवरा सोडून बॉसला महत्त्व, पाहा व्हिडीओ

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून लग्नमंडपातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. लग्नातील मजा-मस्करीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र एका व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये पत्नी नवऱ्याला सोडून लॅपटॉप घेऊन बसली आहे. कारण तिला बॉसचा फोन आला आहे. 

कोव्हिडमुळे अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामध्ये लग्नाचे सीझन अशामध्ये एका नववधून चक्क लग्नात लॅपटॉप घेऊन काम केलं आहे. एका बाजूला लग्न सुरू होतं. तर दुसरीकडे नववधू लॅपटॉपवर काम करत होती. यामध्ये तिला कॉल आला आणि ती पुन्हा जोमाने कामाला लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा नावाच्या युझरने शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेक लोकांनी लाईक केलं आहे. लोक आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.