लग्नाचे विधी होताच नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले, नवरीच्या कुटुंबीयांनी धू-धू धुतले

Bride Family Tied Groom To Tree And Beaten: शेरवानी घातलेल्या नवरदेवाला झाडाला बांधून ठेवला होता. तर, नवऱ्याच्या नातेवाईकांना मांडवातच रोखून ठेवले होते

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 15, 2023, 03:50 PM IST
लग्नाचे विधी होताच नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले, नवरीच्या कुटुंबीयांनी धू-धू धुतले title=
Groom thrashed by brides family and guests

Bride Family Tied Groom To Tree And Beaten: नवरा वरात घेऊन वधूच्या घरी गेला लग्नाचे (Wedding) काही विधीही पार पडले. मात्र अचानक लग्न मांडवात घडलं असं काही की नवरीच्या नातेवाईकांनी नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले. तर, नवरदेवाच्या (Groom) नातेवाईंकाना मांडवातच थांबवून ठेवले. त्यानंतर प्रकरण इतकं वाढले की पोलिसांमा मध्ये पडावे लागले. पोलिसांनी लग्न मांडवात पोहोचून नवरदेवाला तुरुंगात टाकले आहे. या प्रकरणामुळं परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. (Bride And Groom News)

14 जून 2023 रोजी संध्याकाळी प्रतापगढ येथे राहणाऱ्या राम किशोर वर्मा यांच्या मुलीचं लग्न होणार होतं. जौनपुरच्या अमरजीत वर्मासोबत तिचे लग्न ठरले होते. संध्याकाळी लग्नाचे काही विधी झाले होते. वरमालाची तयारी सुरू असतानाच वर पक्ष व वधू पक्षात वाद निर्माण झाले. वाद इतके वाढले की लग्नाचा मांडवच कुस्तीचा आखाडा ठरला. दोन्ही पक्षांकडील नातेवाईकांनी एकमेकांना माराहाण करण्यास सुरुवात केली. 

त्याचं झालं असं की, लग्नाचे विधी सुरु असताचा नवरदेवाने व त्याच्या कुटुंबीयांनी वधुपक्षाकडे हुंड्याची मागणी केली. नवरदेवाला खूपदा समजवायचा प्रयत्न केला मात्र तो हुंड्यासाठी अडून बसला. हुंडा न मिळाल्यास लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी नवरदेवाने दिली. नवरदेवाच्या या वागण्यावर नवरीच्या नातेवाईकांचा संताप झाला. त्यांमुळ रागाच्याभरात त्यांनी नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले. 

वधु पक्षाच्या नातेवाईकांनी नवरदेवाच्या कुटुंबीयांना मांडवातच रोखून ठेवले. तर, मांडवाजवळच असलेल्या झाडाला एका रश्शीच्या सहाय्याने नवरदेवाला बांधून ठेवले. तसंच, त्याला माराहणदेखील करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा शेरवानी घातलेल्या नवरदेवाला झाडाला बांधून ठेवण्यात आले होते.सगळ्यात पहिले पोलिसांनी नवरदेवाला सोडवले व सगळ्यांना घेऊन पोलिस ठाण्यात गेले.

पोलिसांनी नवरदेवाला पोलिस ठाण्यात नेले असून हुंडा मागितल्याप्रकरणी तुरुंगात टाकले आहे. नवरदेवाचे वडील, मित्र व अन्य नातेवाईकांना त्याला भेटायची परवानगीदेखील पोलिसांनी नाकारली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाने हुंडा मागितला होता. तसंच, त्याच्या एका मित्राने लग्नस्थळी कोणाचीतरी छेड काढली होती. त्यामुळं वधुपक्षातील लोकं संतापले होते. व प्रकरण इतकं वाढले की दोन्ही पक्षातील लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. व लोकांनी नवरदेवाला झाडाला बांधून ठेवले. सध्या आम्ही दोघांचीही समजूत घालून त्यांना परत पाठवले आहे.