सुमेरपूर (उत्तर प्रदेश): लग्नाच्या मंडपात अनेक किस्से घडत असतात. कधी नवरदेवाकडून मजेशीर गोष्ट घडते तर कधी तरुणीने लग्नानंतर दिलेली ऑफर नवरदेवाला कळते असे काही मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. याच दरम्यान लग्नाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाला चक्क त्याच्या आईनं चपलेनं चोप दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
लग्नाचा माहोल रंगात आला होता. सात फेरे झाले. वरमाला घातल्या आणि त्यानंतर आईनं नवरदेवाला चपल फेकून मारली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच चर्चा रंगली. आईचा मार खाण्यापासून वाचण्यासाठी नवरदेवाला बायकोमागे लपण्याची वेळ लग्नमंडपात आली.
UP के चप्पल में बड़ी बात है रे बावा..कभी त्रिपाठी जी जूते चलाने में जगह नहीं देखते आज अम्मा ने भी नहीं देखा..अब नया गाना होगा.. up वाला चप्पल चलाओ कि हीरो जैसे मार के दिखाओ...हरिमपुर जिले का ये वीडियो बड़ा ही जान लेवा है.....अब भईया घर वालों के अगेंस्ट जाके ब्याह नहीं.@UPGovt pic.twitter.com/kFNTfogJMY
— Anamika amber'ainaa' ا(@AnamikaamberA) July 6, 2021
स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना उत्तर प्रदेशातील सुमेरपूर पोलिस स्टेशन परिसरात घडली. भर लग्नात आईनं मुलाला मारणंही बाब धक्कादायक आहे. मुलाने आंतरजातीय विवाह केल्यानं आईचा संताप अनावर झाला आणि तिने हा प्रकार केला. आईनं आपला चेहरा पदराने झाकून घेतला होता.
काही दिवसांपूर्वी मुलाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीशी कोर्टात लग्न केलं. परंतु त्या मुलाच्या कुटुंबातील लोक विरोधात होते. मात्र, यासाठी मुलीच्या कुटूंबाचे सदस्य सज्ज झाले आणि त्यांनी आडमुठेपणाने लग्न करण्यास सहमती दर्शविली. तथापि, यादरम्यान मुलीच्या वडिलांनी मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित केले नाही आणि नंतर लग्नाच्या दिवशी जेव्हा वधूच्या आईने चप्पल फेकून मारली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.