जीएसटी परिषदेतून मोठ्या घोषणेची शक्यता

गुवाहाटीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक सुरू झाली आहे. दोन दिवस ही बैठक चालणार असून यात काही वस्तूंच्या किंमती कमी करण्याची घोषणा होऊ शकते.

Updated: Nov 10, 2017, 12:21 PM IST
जीएसटी परिषदेतून मोठ्या घोषणेची शक्यता title=

नवी दिल्ली : गुवाहाटीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक सुरू झाली आहे. दोन दिवस ही बैठक चालणार असून यात काही वस्तूंच्या किंमती कमी करण्याची घोषणा होऊ शकते.

आज बैठक संपल्यावर याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. जीएसटीच्या दरांमध्ये कमी करून सरकार राजकीय आखाड्यात दंगल करण्याच्या विचारात आहे. दैनंदिन जीवनातील वस्तू स्वस्त केल्या जाऊ शकतात. 

असे मानले जात आहे की, जीएसटी परिषदेतून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ टक्के स्लॅबमधून  अनेक वस्तू हटवल्या जाऊ शकतात. झी बिझनेसच्या वृत्तानुसार, एकूण २२७ प्रॉडक्टमधील १६५ वर जीएसटी घटवला जाईल. म्हणजे केवळ ६२ वस्तूंवरच २८ टक्के कराचा स्लॅब राहिल. 

जाणकारांनुसार, प्रॉडक्ट स्वस्त करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असेल. याचा परिणामा गुजरात निवडणुकीत बघायला मिळू शकतो. यासोबतच जानेवारी २०१९ पर्यंत ७ राज्यांमध्ये होणा-या निवडणुकांवरही याचा प्रभाव पडेल. जीएसटी परिषदेच्या बैठकीत कंपोझिशन स्किमची मर्यादा वाढू शकते. कंपोझिशन स्किममध्ये जीएसटी रेटलाही एक रेट करण्याचा प्रस्ताव आहे. 

काय होऊ शकतं स्वस्त 

च्युइंगम
चॉकलेट
टाईल्स
शॅम्पू
साबण, डिटरजंट
लेदर प्रॉडक्ट
पॉलिश
स्टील सेनेट्रिवियर
प्लायवूड
रेजर 
टूथपेस्ट
हेअर ऑईल
सिलिंग फॅन