नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही गुजरात निवडणुकीसाठी जाहीर सभा घेत आहेत. मोदींनी बुधवारी चार जाहीर सभा घेतल्या. यापैकी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं भाषण दोन मिनिटांसाठी अचानक थांबवल्याचं पहायला मिळालं.
बुधवारी मोदींनी घेतलेल्या सभांपैकी तीन सौराष्ट्र आणि एक दक्षिण गुजरातमधील नवसारीमध्ये घेण्यात आली. नवसारतील सभेत मोदींनी आपलं भाषण तब्बल दोन मिनिटे थांबवलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचार करत असताना जाहीर सभेला संबोधित करत होते. त्याच दरम्यान अचानक 'अजान' ऐकताच मोदींनी आपलं भाषण थांबवलं. जवळपास दोन मिनिटांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं भाषण थांबवलं होतं.
PM Narendra Modi pauses speech during Navsari rally yesterday on hearing the Azaan #GujaratElection2017 pic.twitter.com/MfwN4orIyH
— ANI (@ANI) November 30, 2017
यापूर्वी म्हणजेच २०१६ साली पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजानमुळे आपलं भाषण थांबवलं होतं.
मार्च २०१६मध्ये पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा आयोजित केली होती. या सभेच्या जवळच एक मशिद होती. रॅलीला संबोधित करत असताना अजान सुरु झालं. अजान ऐकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण थांबवलं.