मुंबई : रक्तदानाला आत्तापर्यंत 'महादान' म्हणून ओळखलं जात होतं... परंतु, यापुढे मात्र रक्तावरही जीएसटी लागण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारनं रक्तावर १२ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतलाय. १ जानेवारीपासून देशभरात रक्तावरही जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
जीएसटीनंतर रक्ताची एक पिशवी तब्बल २०० रुपयांनी महाग होणार आहे... गरजु रुग्णांसाठी हा फार महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा एनजीओ आणि सामान्यांकडून विरोध होत आहे. डॉक्टर संघटनांकडूनही केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत रक्त जीएसटी अंतर्गत न आणण्याची मागणी केलीय.
सध्या १ युनिट रक्ताची किंमत १०५० रुपये आहे. जीएसटी लागल्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ होईल.