गुजरातमध्ये अपक्ष उमेदवाराने धरला काँग्रेसचा हात, काँग्रेस आमदारांची संख्या वाढली

गुजरात विधानसभा निवडणुकीत मोरवा हदफ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणून आलेल्या भूपेंद्र सिंह खांट यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 24, 2017, 11:48 PM IST
गुजरातमध्ये अपक्ष उमेदवाराने धरला काँग्रेसचा हात, काँग्रेस आमदारांची संख्या वाढली title=
File Photo

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत मोरवा हदफ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणून आलेल्या भूपेंद्र सिंह खांट यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भूपेंद्र सिंह खांट यांनी काँग्रेसचा हात धरल्याने आता गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या वाढली आहे. यापूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसचे ७७ आमदार होते. मात्र, आता खांट यांच्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या ७८ झाली आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी)सोबत हातमिळवणी केली होती. त्यानुसार, मोरवा हदफची जागा बीटीपीला दिली होती. या जागेवर अपक्ष निवडणूक लढणारे भूपेंद्र सिंह खांट यांनी विजय मिळवला. 

भूपेंद्र सिंह खांट यांनी भाजपच्या विक्रम सिंह डिंडोर यांचा ४,००० मतांनी पराभव केला. तर, बीटीपी उमेदवार अल्पेश दामोर हे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. 

गुजरात निवडणुकीत भाजपने विजय मिळवत सिक्सर लगावला आहे. मात्र, २०१२च्या निवडणुकीची तुलना केली असता भाजप आमदरांची संख्या घटली आहे. २०१२मध्ये भाजपचे ११५ आमदार होते तर, आता ९९ आमदार आहेत.

गुजरात निवडणुकीत ७७ जागांवर विजय मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाला एक चांगला संकेत मिळाला आहे. काँग्रेस पक्षाचे १६ उमेदवार ३००० हून कम मतांपेक्षा कमी अंतराने पराभूत झाले आहेत.