गुजरात: भाजप आघाडीवर, कॉग्रेसही देतीय टक्कर

गुजरात विधानसभा निवडणूक निकालासाठी प्रत्यक्ष मतमोजनीस सुरूवात झाली असून, प्राथमिक कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 18, 2017, 08:53 AM IST
गुजरात: भाजप आघाडीवर, कॉग्रेसही देतीय टक्कर title=

मंबई : गुजरात विधानसभा निवडणूक निकालासाठी प्रत्यक्ष मतमोजनीस सुरूवात झाली असून, प्राथमिक कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. एकूण 182 जागांपैकी जवळपास 100 जागांवरील प्राथमिक कल हाती येत आहेत. त्यापैकी भाजप 92  तर, कॉंग्रेस 66 जागेवर आघाडीवर आहे. हा आकडा क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे.

दरम्यान,  गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका पार पडल्या. या मतदानाची एकूण मतमोजणी आज (सोमवार) पार पडत आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले होते. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला गेला.