गुजरात : गुजरातची निवडणूक जवळ आहे. दरम्यान, कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेते जिंकण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत आहेत. यावेळी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात यात्रे दरम्यान नरेंद्र मोदींचा गड असलेल्या मेहसाणा येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाजपाबद्दल असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर राहुल यांनी मेहसाणा येथे रोड शो केला. पाटीदार असे लिहिलेली टोपी राहूल यांनी घातली. मेहसाना पर्यंत पोहोचल्यानंतर राहुल यांनी पहिल्यांदा सरदार पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
पंतप्रधान मोदींना लक्ष्य करून ते म्हणाले, मोदीजी भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहेत. पण मी व्यापाऱ्यांशी बोललो. व्यापारी म्हणतात पोलीस त्यांना त्रास देतात.
"मी मोदींच्या केंद्रीय मंत्र्यांना विचारले की चीन ५० हजार तरुणांना नोकरी देत आहे. आपण किती तरुणांना रोजगार देतो ? तेव्हा केंद्रीय मंत्री म्हणाले की, स्टार्ट अप आणि मेक इन इंडिया नंतर आपम २४ तासात ४५० युवकांना रोजगार देत आहोत.
प्रत्येक ठिकाणी मेड इन चायना लिहिलेले आपण पाहतो. पण मी यापुढे मेड इन इंडिया, मेड इन गुजरात, मेड इन मेहसाणा लिहिलेले पाहू इच्छितो.
#WATCH Rahul Gandhi campaigning in Mehsana #Gujaratelections2017 pic.twitter.com/S3hoKDIHwF
— ANI (@ANI) November 13, 2017
तुम्हाला पीएम ची 'मन की बात' ऐकण्याची सवय झाली आहे. आम्ही तुमची ही सवय बदलू. आम्ही आपल्या मनाची नाही तर तुमच्या मनातील गोष्ट ऐकणार आहोत.