Nonveg खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी; भारतातल्या 'या' शहरात मांसाहारावर बंदी

भारतातल्या 'या' शहरात मांसाहार पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय

Updated: Sep 19, 2022, 03:55 PM IST
Nonveg खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी; भारतातल्या 'या' शहरात मांसाहारावर बंदी  title=

मुंबई : भारत (India) हा विविधतेत एकता असलेला देश आहे असं म्हणतात. देशातील प्रत्येक राज्याची (states) बोली, खाद्यपदार्थ (Food) आणि ओळख वेगळी आहे. त्याचबरोबर 'इथे एका कोसावर पाणी  तर चार कोसांवर भाषा (languages) बदलते,' अशीही एक म्हण आहे, त्यामुळे आपल्याला भारतात विविध संस्कृती पाहायला मिळतात. देशात एकापेक्षा एक प्राचीन आणि धार्मिक स्थळे आहेत. अशातच साऱ्या जगभरात एक नवीनच ट्रेण्ड सुरु झाला आहे. जगभरात अनेकांनी पूर्णपणे शाकाहारी (Veganism) होण्याचा मार्ग स्विकारला आहे. दरम्यान, भारतात एक असं शहर आहे जे पूर्णपणे शाकाहारी (vegetarian) आहे. हे केवळ भारताचेच नाही तर जगातील पहिले शाकाहारी शहर (world's first vegetarian city) आहे.

गुजरातमधील (gujarat) पालीताना (Palitana) हे शहर जगातील एकमेव शाकाहारी शहर आहे हे पूर्णपणे शाकाहारी (vegetarian city) आहे. 2014 मध्ये, गुजरात सरकारने (gujarat government) त्याला संपूर्ण शाकाहारी घोषित केले होतं. येथे जगभरातून जैन (jain) धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळेच हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जे पूर्णपणे शाकाहारी आहे. या शहरात मांसाहारावर (non vegetarian) पूर्णपणे बंदी (ban) आहे. 

शहरात एक हजाराहून अधिक मंदिरे 

'टाइम्स ट्रॅव्हल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पालीताना (Palitana) शहरात मोठ्या प्रमाणात जैन मंदिरे (jain temple) आहेत. हे शहर गुजरातच्या भावनगर (bhavnagar) जिल्ह्यात आहे. येथे शत्रुजयाच्या टेकड्या आहेत. जगातील ही एकमेव टेकडी आहे जिथे 900 पेक्षा जास्त मंदिरे (jain temple) आहेत. 2014 मध्ये, शेकडो जैन साधू आणि संतांनी येथे उपोषण करत, सरकारने जनावरांच्या हत्येवर बंदी घालण्याची आणि कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली होती. 

साधू संतांच्या निषेधापुढे राज्य सरकारला झुकावे लागले. येथे अनेक ऋषीमुनींना मोक्ष मिळालेत असे मानले जाते. अशा स्थितीत जैन संतांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण करून येथे कडक कायदा करण्यात आला. तसेच हा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई झाली, तेव्हा पालीताणा हे जगातील पहिले शाकाहारी शहर ठरले.

इथे कसे जायचे?

तुम्हालाही इथे जायचे असेल, तर तुम्हाला गुजरातमधील भावनगरहून पालीतानाला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सीची व्यवस्था उपलब्ध आहे. हे ठिकाण शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. यासोबतच तुम्ही वडोदरा किंवा अहमदाबादहून ट्रेन किंवा बसनेही येथे पोहोचू शकता.