कोरोनाच्या धक्क्यातून अजून देश आणि लोकं सावरलेली नसताना नवीन महामारी उंबरठ्यावर आली आहे. शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याची घंटा समोर उभी असल्याच सांगितलं आहे. तो धोका म्हणजे बर्ड फ्लू. बर्ड फ्लूच्या साथीच्या संभाव्य धोक्याबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. ते म्हणतात की, बर्ड फ्लू हा कोरोना व्हायरसपेक्षा 100 पट जास्त धोकादायक असू शकतो आणि त्याची लागण झालेल्या अर्ध्या लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. अलीकडील ब्रीफिंग दरम्यान, संशोधकांनी H5N1 स्ट्रेनसह बर्ड फ्लूवर चर्चा केली होती.
डेली मेलच्या अहवालानुसार, संशोधकांना भीती आहे की हा विषाणू गंभीर उंबरठा ओलांडू शकतो, ज्यामुळे जागतिक महामारी होऊ शकते. ब्रीफिंग दरम्यान, पिट्सबर्ग येथील प्रसिद्ध बर्ड फ्लू संशोधक डॉ. सुरेश कुचीपुडी यांनी इशारा दिला की H5N1 मध्ये साथीचा रोग होण्याची क्षमता आहे. हे मानवांसह अनेक सस्तन प्राण्यांना संक्रमित करू शकते. ते म्हणाले की या विषाणूचा धोका इतका आहे की, त्यामुळे साथीचे आजार-रोग होऊ शकतात.
संशोधकांच्या मते,महत्त्वाचं म्हणजे या विषाणूने अद्याप मानवी शरीरात संसर्ग केलेला नाही पण हा विषाणू जगभरात आधीच अस्तित्वात आहे. एवढंच नव्हे तर त्याने आधीच अनेक सस्तन प्राण्यांना संक्रमित केले आहे आणि सतत पसरत आहे. हीच वेळ आहे की, आपण या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हायला हवे.
कॅनेडियन फार्मास्युटिकल कंपनी बायोनियाग्राचे संस्थापक जॉन फुल्टन यांनी देखील H5N1 साथीच्या आजाराच्या गंभीरतेवर भर दिला. ते म्हणाले की.हा विषाणू कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते. पुढे त्यांनी सांगितले की, हे कोरोनापेक्षा खूप धोकादायक असू शकते आणि जर त्यात उत्परिवर्तन झाले तर त्याचा मृत्यू दर जास्त असतो. या विषाणूची लागण माणसांना झाली तर यामुळे होणारी जीवितहानी ही कमी असावी अशी आशा करु शकतो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2003 पासून H5N1 बर्ड फ्लूची लागण झालेल्या प्रत्येक 100 लोकांपैकी 52 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 887 प्रकरणांपैकी 462 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत कोविड-19 चा सध्याचा मृत्यू दर 0.1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. साथीच्या रोगाच्या सुरूवातीस हा दर सुमारे 20 टक्के होता.
चिंतेचे कारण हे देखील आहे की, काही दिवसांपूर्वी मिशिगनमधील पोल्ट्री फार्म आणि टेक्सासमधील अंडी उत्पादकामध्ये एव्हीयन फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला होता. याव्यतिरिक्त, सस्तन प्राण्यापासून बर्ड फ्लू संसर्गाची पहिली घटना देखील संक्रमित दुग्ध गायी आणि व्यक्तीमध्ये नोंदवली गेली आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने टेक्सासमधील डेअरी फार्म कर्मचाऱ्यामध्ये H5N1 संसर्गाची पुष्टी केली आहे, त्यानंतर व्हाईट हाऊसने कडक निरीक्षण सुरू केले आहे.