ऑनलाईन शाळेवर हॅकर्सचा डोळा; अश्लील क्लिप केली पोस्ट

एकामागोमाग पोस्ट केले अश्लिल पोस्ट  

Updated: Jul 3, 2021, 07:23 AM IST
ऑनलाईन शाळेवर हॅकर्सचा डोळा; अश्लील क्लिप केली पोस्ट

मुंबई : उत्तर गोव्यातील एका ऑनलाईन शाळेतील क्लास हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर गोव्याच्या कलंगुटच्या समुद्राजवळील गावातील एका अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. (Hacker Breaks into Goas Online Classroom Post obscene clip ) 

एका हॅकरने कंडोलिममधील एका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास आयोजित केला होता. याच दरम्यान हॅकरने अश्लील क्लिप पोस्ट केली.

एकामागोमाग पोस्ट केले अश्लिल पोस्ट 

पोलीस अधिकाकारी नोलोस्को रापोसोने शुक्रवारी सांगितलं की,'कलंगुट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कलम 67(ए) पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने सकाळी 11.30 ऑनलाइन 11.30 च्या क्लासला हॅक केलं. यानंतर त्याने अश्लिल व्हिडिओ पोस्ट केले.'

वर्चुअल क्लासमध्ये होते 8 अल्पवयीन मुलं 

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शिक्षकांना तात्काळ ऑनलाइन क्लास संपवावा लागला. रापोसो यांनी सांगितलं की, ज्यावेळी सिस्टिम हॅक झाली. त्यावेळी 8 विद्यार्थी होते. ज्यामधील सर्व विद्यार्थी अल्पवयीन होते. वर्चुअल क्लासमध्ये उपस्थित होते. हे सेशन बंद केल्यामुळे हॅकर्सने केलेला प्रकार बंद झाला. 

 कोरोना विषाणूचा उद्भाव  झाल्यापासून जगभरातील शिक्षण क्षेत्र  पूर्णपणे कोलमडून गेलं आहे. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशात अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा  अवलंब केला जात आहे. अशातच मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाचे ऑनलाइन क्लास सुरू असताना मध्येच पॉर्न व्हिडीओ लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनानं गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे.