राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह,अंजनेरी पर्वतावर भगवा ध्वज

हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावर भगवा ध्वज लावला जातो. त्याची तयारी पूर्ण झाली असून जय बाबाजी परिवारातर्फे हा ध्वज लावला जातो. 

Updated: Mar 31, 2018, 10:49 AM IST
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह,अंजनेरी पर्वतावर भगवा ध्वज   title=

मुंबई : आज राज्यभर हनुमान जयंतीचा उत्साह बघायला मिळत आहे..अहमदनगरमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी होतेय. हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलय..तर हनुमान जयंतीच्या आधी महिनाभर नगर शहरातील चौकाचौकात हनुमान चालीसा पठणाचे सोहळे आयोजित केले जातात. हनुमान जयंतीच्या दिवशी नगरमधे हनुमानभक्त सेवा मंडळाच्या वतीने सव्वा लाख हनुमान चालीसा पठण करण्यात येते. यावेळी हजारो भाविक यांत सहभागी होतात.

अंजनेरी पर्वतावर भगवा ध्वज 

हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावर भगवा ध्वज लावला जातो. त्याची तयारी पूर्ण झाली असून जय बाबाजी परिवारातर्फे हा ध्वज लावला जातो.

यंदा या ध्वजाची लांबी रुंदी २४ फुट बाय ४८ फुट आहे. गेल्या सात वर्षांपासून या परिवाराकडून पर्वतावर ध्वज उभारला जातो.

या महाकाय ध्वजावर हनुमानाचं चित्र रेखाटण्यात आलंय. शिवाय जय श्रीराम आणि गदाही या ध्वजावर रेखाटण्यात आलीय.

ध्वजासाठी बांबू वापरण्यात आलाय त्याची लांबी ३५ फुटांहून अधिक आहे. आज हनुमान जयंतीला हा ध्वज उभारला जाणार आहे.