नवी दिल्ली: अग्रवाल समाज हा प्रभू श्रीरामाचे वंशज असल्याचा दावा छत्तीसगढमधील एका वकिलाने केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या अयोध्या प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सध्या रामाचे कोणी वंशज अस्तित्त्वात आहेत का, असा सवाल उपस्थित केला होता.
'अयोध्येत राम मंदिर उभारलं तर...' पाहा काय म्हणाला बाबरचा वंशज
यानंतर छत्तीसगढ उच्च न्यायालयातील वकील हनुमान प्रसाद यांनी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये त्यांनी अग्रवाल समाज हा रामाचा वंशज असल्याचा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल विचारणा केल्यानंतर मी इंटरनेटवरून माहिती व पुरावे गोळा केले. याशिवाय, अग्र भागवत या ग्रंथामध्येही महाराज अग्रसेन हे कुशाचे ३४ वे वंशज असल्याचे म्हटले आहे. कुश हा रामाचा पूत्र होता. ग्रवाल समाजातील लोक महाराज अग्रसेन यांचे नातू आणि पणतू लागतात. त्यामुळे आम्हीच रामाचे वंशज असल्याचे हनुमान प्रसाद यांनी म्हटले आहे.
Hanuman Prasad Aggarwal: And it is also written in Agar Bhagwat that Maharaja Agrasen, the ancestral man of the Agrawal community, is 34th generation of Kush, son of Lord Ram. All Agarwals who are sons and grandsons of Maharaj Agrasen are Lord Ram's descendants.(22/8/2019) https://t.co/FlDgmaQASd
— ANI (@ANI) August 23, 2019