'भाजपा मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत'

 गुजरातमध्येही भाजपा मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचं हार्दिक पटेलने म्हटलय. 

Updated: Dec 17, 2017, 12:32 PM IST
'भाजपा मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत' title=

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबर रोजी येणार आहे. ईव्हीएमशी छेडछाड करून अनेक निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधकांनी भाजपावर केला आहे.

तोच धागा पकडून, गुजरातमध्येही भाजपा मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचं हार्दिक पटेलने म्हटलय. 

हार्दिकचा दावा 

१८ डिसेंबरच्या आधीच्या रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला आहे.

भाजपाने ईव्हीएममध्ये घोटाळा केला नाही तर भाजपाच्या खिशात ८२ जागा जातील, असा दावाही हार्दिक पटेल यांनी केला आहे.

हार्दिकचे ट्विट 

ट्विटच्या माध्यमातून हार्दिक पटेलने भाजपावर हे आरोप केले आहेत.