मुंबई : बातमी बाईक प्रेमींसाठी आनंदाची...अमेरिकन बाईक मेकर हार्ले डेव्हिडसनं आशियाई विशेषतः भारतीय ग्राहकांसाठी २५० ते ५०० सीसीच्या बाईक्स लवकरच बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही वर्षात भारतीय तरुणाईत रॉयल एन्फिल्डच्या सगळ्या गाड्या अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. दिवसेंदिवस एन्फिल्डच्या मागणीत होणारी वाढ बघता हार्ले डेव्हिडसनची या नव्या ग्राहकांवर नजर आहे. हार्ले डेव्हिडसन ही जगातल्या सर्वोत्तम क्रूझर बाईक्स बनवणारी कंपनी आहे. सध्या या कंपनीच्या गाड्य़ा भारतात उपलब्ध आहेत. पण त्याची किमान किंमत साडे पाच लाखाच्यावर आहे. शिवाय त्यावर सीमा शुल्कही लागतं. त्यामुळे ही गाडी सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. भारतीय बाजारातील २५० ते ५०० सीसीच्या गाड्या विशेषतः बुलेट घेणाऱ्या प्रत्येक तरुणाला एकदा तरी हार्लेची मालकी मिळावी अशी इच्छा असते. आता ही इच्छा पूर्ण होणार, असं दिसतंय.
अमेरिकेची प्रसिद्ध मोटारसायकल कंपनी हार्ले - डेव्हिडसनसनं आता भारतासहीत इतर आशिया बाजारात दमदारपणे उतरण्यासाठी वेगळी युक्ती लढवण्याचा निर्णय घेतलाय. आशियातील टी-व्हीलरचा वेगानं वाढलेला बाजार लक्षात घेता येत्या २ वर्षांत भारतीय बाजारात आपली नवी बाईक उतरवण्याची तयारी हार्ले डेव्हिडसननं केलीय. कंपनीच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२१ पर्यंत भारतात टू-व्हीलर वाहनांची विक्री २५ टक्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
सध्या भारतात हार्ले डेव्हिडसनच्या ५०० सीसी आणि त्याहून अधिक क्षमतेच्या बाईक उपलब्ध आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षात भारतात या कंपनीच्या बाईकची विक्री सतत घटताना दिसत आहे. वर्ष २०१७ मध्ये भारतात कंपनीच्या ३६९० बाईकची विक्री नोंदवण्यात आली. हीच संख्या २०१८ साली ३४१३ बाईकवर आली. चालू आर्थिक वर्षातही कंपनीच्या बाईक विक्रीत २१ टक्क्यांची घसरण दिसून येतेय. सद्य आर्थिक वर्षात एव्हान कंपनी केवळ ७०७ बाईक विकू शकलीय. त्यामुळे, भारतीय बाजाराच्या अनुकूल बाईकची निर्मिती करण्याच्या योजनेवर हार्ले डेव्हिडसन काम करतेय.
गेल्या काही वर्षांत २५०-५०० सीसी क्षमतेच्या बाईकची मागणी भारतात वाढलेली दिसून आली. या सेगमेंटमध्ये भारतीय कंपनी 'रॉयल - एनफिल्ड' सध्या उच्च स्थानी आहे. तरुण वर्गात रॉयल एनफिल्डची वाढती मागणी लक्षात घेता हार्ले डेव्हिडसननंही या क्षमतेच्या बाईक भारतीय बाजारात उरवण्याची योजना आखलीय.
सध्या हार्लै डेव्हिडसन भारतात आपली १६ मॉडलच्या बाईकची विक्री करते. यांची किंमत सव्वा पाच लाखांपासून सुरू होते.