व्हिडिओ : टोल कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखून त्यानं काढला पळ

पोलिसांनी घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलंय

Updated: May 16, 2019, 11:39 AM IST
व्हिडिओ : टोल कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखून त्यानं काढला पळ title=

गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्रामच्या एका टोल प्लाजावर एका कारचालकानं टोलची मागणी करणाऱ्यांवर थेट बंदूक रोखली... आणि टोल न भरताच तिथून पळ काढला. नेहमीप्रमाणे टोल कर्मचाऱ्यांनी कामाचा भाग म्हणून या कार चालकाला अडवलं. त्याच्याकडे टोलचे पैसे मागितले तेव्हा या व्यक्तीनं त्यांच्या थेट बंदुक दाखवली... आणि बॅरिकेड हटवण्यास सांगितलं. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी बॅरिकेड काढताच कारचालकानं गाडी भरधाव वेगानं काढत पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. 

वृत्तसंस्था एएनआयनं हा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. व्हिडिओमध्ये गाडीत दोन जण बसल्याचं दिसून येतंय. यातील एकाच्या हातात बंदूकही स्पष्टपणे या व्हिडिओत दिसतंय. दरम्यान पोलिसांत या घटनेची तक्रार करण्यात आलीय. पोलिसांनी घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलंय. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.