मुंबई : हाथरस पाशवी अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. आधी अत्यंत त्रोटक प्रतिक्रिया देणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होता. आता, प्रविण दरेकरांनी शरद पवारांसह महाविकास आघाडीवरच आरोपांची राळ उठवली आहे.
उत्तर प्रदेश सरकारची वागणूक घृणास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यावर स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी शरद पवार यांची वागणूक असल्याचा आरोप दरेकांनी केला. जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या दरेकरांनी बदनापूर तालुक्यातील रोषणगाव, धोपटेश्वर इथल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या दुर्दशेला मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.
अखेर हाथरस गावात मीडियाला प्रवेश देण्यात आला. त्यामुळे पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना मीडियाला भेट घेता आली. या कुटुंबाचं दु:ख पहिल्यांदाच जगाच्या समोर आले आहे. आमच्यावर अन्याय झाल्याची पीडित कुटुंबाने भावना व्यक्त केली आहे. आमच्यावर दबाववाढविण्यात येत आहे. ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली सांगत आहेत, तसे काहीही झालेले नाही. गावात कोणालाच प्रवेश नसताना भाजपचे दोन लोक गावात कसे आले, असा सवालही पीडितेच्या भावाने मीडियासमोर उपस्थित केला.