मुख्यमंत्री शपथ सोहळा : कुमारस्वामी यांनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट

जेडीएस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.   

सुरेंद्र गांगण | Updated: May 22, 2018, 03:19 PM IST
मुख्यमंत्री शपथ सोहळा : कुमारस्वामी यांनी घेतली सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट title=

नवी दिल्ली : जेडीएस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.  कुमारस्वामी यांनी दोघांना शपथविधीचं सोहळ्याचं निमंत्रण दिलं. तसंच या भेटीत कुमारस्वामी कॅबिनेट मंत्रिपदाच्या वाटाघाटीवरही चर्चा केल्याचं समजतंय. 

कुमारस्वामींचा गुरूवारी मुख्मंत्रिपदाचा शपथविधी आहे.  काँग्रेसनं कुमारस्वामींना मुख्यमंत्री पद देऊ केले आहे. मात्र काँग्रेसनं २० कॅबिनेट मंत्रिपदांवर दावा सांगितला असून  जेडीएसला १३  मंत्रिपदं देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. कुमारस्वामींना भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्याही मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलंय. 

तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री ममता बॅनर्जी, बसप नेत्या मायावती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू आदींनाही कुमारस्वामी यांनी निमंत्रण दिलेय.