HDFC Bank : ग्राहकांसाठी गुडन्यूज ! RBIची HDFC आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणास मान्यता

 HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Updated: Jul 5, 2022, 01:58 PM IST
HDFC Bank : ग्राहकांसाठी गुडन्यूज ! RBIची  HDFC आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणास मान्यता   title=

मुंबई : HDFC Bank Merger :  रिझर्व्ह बँकेने बीएसई आणि एनएसईने एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. यासंदर्भात एचडीएफसीला आरबीआयकडून पत्रही मिळाले आहे.

दीर्घ प्रक्रियेनंतर, HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) दिलेल्या माहितीनुसार त्याची मूळ कंपनी एचडीएफसी लिमिटेडमध्ये (HDFC Ltd.) विलीनीकरणाच्या प्रस्तावाला भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) मंजुरी मिळाली आहे.

 HDFC Bank ने सांगितले की, 'एचडीएफसीला 4 जुलै 2022 रोजी आरबीआयचे पत्र प्राप्त झाले आहे. यामध्ये आरबीआयने या योजनेसाठी आपला 'ना हरकत'  (NOC) दिली असून त्यासाठी काही अटी नमूद ठेवल्या आहेत. विलीनीकरणासाठी काही वैधानिक आणि नियामक मान्यता आवश्यक असतील. आम्ही तुम्हाला सांगतो की आठवड्याच्या सुरुवातीला, BSE आणि NSE कडून प्रस्तावित विलीनीकरणासाठी मंजुरी मिळाली होती.

सुमारे 40 अब्ज डॉलर्सच्या या अधिग्रहणामुळे वित्तीय सेवा क्षेत्रातील एक मोठी कंपनी अस्तित्वात येईल. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणामुळे ही नवीन कंपनी अस्तित्वात येईल. प्रस्तावित युनिटची एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपये असेल.

ग्राहकांवर काय परिणाम होईल?

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाचा परिणाम ग्राहक आणि भागधारक दोघांवर होईल. प्रत्येक HDFC शेअरधारकाला HDFC च्या 25 शेअर्ससाठी HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील. एचडीएफसीचे विद्यमान भागधारक एचडीएफसी बँकेत 41 टक्के हिस्सेदारी ठेवतील. यानंतर, एचडीएफसी बँकेची संपूर्ण मालकी सार्वजनिक भागधारकांच्या हातात असेल.