पाटना : दिवसागणिक महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. आज पाहायला गेलं तर देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात महिला सुरक्षित नसून शाळा देखील मुलीसांठी धोकादायक ठरत आहे. दरम्यान पाटन्यात ५वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने बलात्कार केला. या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मदत करणाऱ्या लिपिक अभिषेकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शिवाय या प्रकरणात कोर्टाने मुख्याध्यापकाला एक लाख रुपये आणि लिपिकाला पन्नास हजार रुपये दंडही ठोठावला आहे. सप्टेंबर 2018 मध्ये, पाटनातील फुलवारीशरीफ परिसरातील मित्र मंडळ कॉलनीत असलेल्या न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अरविंद कुमार यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार केला.
धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर पालकांना आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचं समजलं. मुलीच्या पोटाट दुखायला लागल्यामुळे तिला डॉक्टरकडे उपचारासाठी नेल्यानंतर घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
संबंधीत घटनेचा पुरावा देखील पोलिसांकडे आहे. शिवाय पीडित मुलीचा आणि मुख्याध्यापच्या डीएनएची तपासणी केली असता ती मॅच झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता पीडित मुलीचं गर्भपात करण्यात आला आहे.