आरोग्य मंत्रालयाचे निर्णय चुकीचे तसेच वास्तवाला धरून नाही; IMA चा केंद्रावर घणाघाती आरोप

इंडियन मेडिकल असोशिएशन (IMA)ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयावर कठोर टीका केली आहे.

Updated: May 9, 2021, 08:10 AM IST
आरोग्य मंत्रालयाचे निर्णय चुकीचे तसेच वास्तवाला धरून नाही; IMA चा केंद्रावर घणाघाती आरोप title=
representative image

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोशिएशन (IMA)ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयावर कठोर टीका केली आहे. कोविड 19 रोगाशी लढण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. असं IMA ने म्हटलं आहे.

दुसरी लाट रोखण्यासाठी पावलं  उचलली नाहीत : IMA
डॉक्टरांच्या IMA संघटनेने म्हटले आहे की,  आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलली नाहीत. आरोग्य मंत्रालयाने आतातरी जागं  झालं पाहिजे. कोविड 19 आजार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी तातडीने प्रयत्न करायला हवे.

चुकीच्या निर्णयांमुळे हैराण

IMA ने म्हटलं आहे की, 'कोविड19 च्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील रुग्णांचे हाल होत आहेत. त्याला आरोग्य मंत्रालयाचा हलगर्जीपणा आणि चुकीचे निर्णय कारणीभूत आहेत. या निर्णयांमुळे आम्ही हैराण आहोत'.

IMA गेल्या 20 दिवसांपासून आरोग्य सुविधा वाढण्यावर आणि वैद्यकीय साधन सामुग्री तसेच कर्मचाऱ्यांना तयार करण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाऊनच्या नियोजनावर जोर देत आहे.

IMA ने असाही आरोप लावला आहे की, 'कोविड19 च्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जे निर्णय घेतले जात आहेत. त्यांचा वास्तवाशी काही घेणं देणं नाही. जमीनीस्तरावरील सत्य परिस्थिती समजून घेण्यास तयार नाही.IMAच्या मते त्यांचे सदस्य आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे सरकारने दूर्लक्ष केले आहे.'