कोलकाताच्या दमदम भागात स्फोट

सुरक्षेच्या कारणास्तव परिसर केला रिकामा

Updated: Oct 2, 2018, 05:44 PM IST
कोलकाताच्या दमदम भागात स्फोट title=

कोलकाता : दमदम भागात स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट मुख्य बाजारातील एका इमारतीत झाला. या स्फोटात 6 जण जखमी झाले असून 4 जण गंभीर आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा स्फोट दम पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी झाला आहे.

फळाच्या दुकानाबाहेर सकाळी 9 वाजता हा स्फोट झाला. या इमारतीत महत्त्वाची कार्यालयं देखील आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार  स्फोट हा कशामुळे झाला याची चौकशी अजून सुरु आहे. फॉरेंसिक टीम देखील या ठिकाणी तपास करत आहे.

कोलकाता पोलिसांनी म्हटलं की, घटनास्थळी लोखंडाचे काही कण आढळले आहेत. हा भाग सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा करण्यात आला आहे.