हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, १४ जणांना अटक

दिल्लीनजिक गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केलाय.

Updated: Aug 3, 2017, 05:55 PM IST
हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, १४ जणांना अटक  title=

नवी दिल्ली : दिल्लीनजिक गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केलाय.

यावेळी पोलिसांना कंडोम, गर्भनिरोधक  गोळ्या, बीअर आणि दारुच्या बाटल्यांचा खच सापडला. घटनास्थळावरून पोलिसांनी ८ तरुण आणि ६ तरुणींना ताब्यात घेतलंय. 

गुप्त सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी इंदिरापूरच्या एका घरावर टाकलेल्या धाडीनंतर हा प्रकरा समोर आलाय. धाड टाकल्यानंतर पोलिसांसमोर जे दृश्य होतं त्यानं पोलिसांनाही धक्का बसला. हे एक हायप्रोफाईल सेक्स रॅकेट असल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.