Himachal Pradesh Election Date 2022: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eelection Commission) हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. दिल्ली इथल्या विज्ञान भवनमध्ये घेतल्या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभान विधानसभा निवडणूकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी (Himachal Pradesh Assembly) 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होईल.
गुजरात (Gujrat) आणि हिमाचल प्रदेशमध्ये सध्या भाजपचं (BJP) सरकार आहे. यंदा गुजरातमध्ये भाजपला आम आदमी पार्टीची (AAP) जोरदार टक्कर असल्याचं बोललं जात आहे. गेल्या निवडणुकीत गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्यात आलं होतं. तर हिमाचल प्रदेशमध्ये एका टप्प्यात मतदान पार पडलं होतं. यावेळी देखेली हिमाचल प्रदेशमध्ये एका टप्प्यातच मतदान घेतलं जाणार आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी मतदान होणार आहे. 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपने 44 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं. तर काँग्रेसला 21 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. इतर पक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. एकूण मतदानाच्या 48.8 टक्के मतदान एकट्या भाजपला मिळालं होतं.
2017 ला गुजरातमधली स्थिती
2017 गुजरात विधानसभेच्या 198 जागांसाठी 2 टप्प्यात मतदान पार पडलं होतं. यावेळी 68.41 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत भाजपने तब्बल 99 जागा पटकावत एकहाती विजय मिळवला होता. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या, तर एनसीपी 1, भारतीय ट्रायबल पार्टी 2 आणि अपक्षांना तीन जागा मिळवता आल्या होत्या. याआधी 2012 विधानसभा निवडणुकीत भाजपने 115 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 61 जागा मिळाल्या होत्या.