थोडक्यात जीव वाचला, दरड कोसळतानाचा पाहा लाईव्ह व्हिडीओ

अचानक दगड हवेत फेकले गेले....माती ढासळली अन् धुळीचे चे लोट उठले, पाहा भीषण व्हिडीओ

Updated: Jul 25, 2021, 05:22 PM IST
थोडक्यात जीव वाचला, दरड कोसळतानाचा पाहा लाईव्ह व्हिडीओ

हिमाचल: तरुण बाल्कनीत मोबाईल घेऊन काहीतरी करत असताना अचानक मोठा आवाज आला. समोर पाहिलं तर धुळीचे लोट दिसत होते. माती उडाली आणि अचानक मोठे दगड गडगड डोंगरावरून येऊन खाली आदळत होते. काही कळण्याआधीच हे चित्र कॅमेऱ्यात कैद झालं आणि तरुणही घाबरला. दरड कोसळल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हिमाचल प्रदेशात किन्नोर जिल्ह्यातील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे. दरड कोसळून गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं तिथे असलेल्या लोकांना कोणतीही इजा झाली नाही. 

दुसरीकडे महाराष्ट्रात दरड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. रायगडच्या तळीयेतील अख्खं गाव दरडीच्या मलब्याखाली गेलं. आतापर्यंत 45 हून अधिक मृतदेह काढण्यात आले. भोर आणि साताऱ्यातही दरड कोसळून मोठं नुकसान झालं आहे.