राम: रामौ रामा: .... शाळांमध्ये दुसरीपासूनच गिरवले जाणार संस्कृतचे धडे

राज्याच्या शिक्षण मंडळाची मंजुरी

Updated: Nov 20, 2019, 12:11 PM IST
राम: रामौ रामा: .... शाळांमध्ये दुसरीपासूनच गिरवले जाणार संस्कृतचे धडे  title=
संग्रहित फोटो

धर्मशाला : हिमाचल प्रदेशच्या शाळांमध्ये आता इयत्ता दुसरीपासून विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे धडे देण्यात येणार आहेत. राज्याच्या शिक्षण मंडळाने या अभ्यासक्रमाला मंजूरी दिल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय शाळेत डमी प्रवेश केल्यास शाळेची संबद्धता संपुष्टात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मंगळवारी झालेल्या शिक्षण मंडळाच्या बैठकीत राज्याचे शिक्षणमंत्री सुरेश भारद्वाज यांनी ही माहिती दिली.

सध्या अनेक शाळांमध्ये डमी अॅडमिशन केलं जातं. अनेकदा मुले बाहेर जातात. अशा घटना रोखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून एक समिती तयार करण्यात येणार आहे. कोणतीही शाळा अशा प्रकारांमध्ये सामिल असल्याचं आढळल्यास त्या शाळेची संबद्धता रद्द करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. 

  

विद्यार्थ्यांसाठी शाळेत असणाऱ्या वर्गांबाबत प्रश्नावर शिक्षण मंत्र्यांनी, वर्गांची संख्या काही प्रमाणात कमी असून त्यावर काम करण्यात येत असल्याचं सांगितलं.