Hindu Funeral Rites:अंत्ययात्रेत अग्नी पेटवलेले मडके आणि विवाहातील सप्तपदीचं आहे कनेक्शन?

Hindu Funeral Rites: हिंदू धर्मात मृत व्यक्तीचे शरीर नष्ट केले जाते. पुर्वीच्या काळी मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे गंगा नदीच्या (Ganga River) ठिकाणी केले जाते तर आता अंत्यसंस्कार हे धार्मिक विधींसह स्मशानभूमीत केले जाते.

Updated: Jan 5, 2023, 06:35 PM IST
Hindu Funeral Rites:अंत्ययात्रेत अग्नी पेटवलेले मडके आणि विवाहातील सप्तपदीचं आहे कनेक्शन? title=

Hindu Funeral Rites: हिंदू धर्मात मृत व्यक्तीचे शरीर नष्ट केले जाते. पुर्वीच्या काळी मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे गंगा नदीच्या (Ganga River) ठिकाणी केले जाते तर आता अंत्यसंस्कार हे धार्मिक विधींसह स्मशानभूमीत केले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी मृत व्यक्तीचे शरीर तूप, मध, दूध किंवा दह्यानं धुतले जाते. संपुर्ण शरीरही कपड्यांनी झाकले जाते. लग्न झालेली नवी नवरी गेली असेल तर तिचे शरीर नव्या नवरीप्रमाणे नटवले जाते आणि तिच्यावर अंत्यसंस्कार (Last Rights) केले जातात. त्यासोबत मृतव्यक्तीच्या शरीरावर फूलं आणि हारं ठेवले जातात. त्याचबरोबर यावेळी मृत व्यक्तीचे नातेवाईक हातात आग लावलेलं मटकं घेऊन त्या व्यक्तीच्या बाजूनं चालतात. (hindu funeral rituals what is the connection between fire in funeral and saptapadi)

हिंदू धर्मात मृतव्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. जेव्हा परिवारातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीला घरात ठेवण्यापासून ते अंतिम संस्कार करेपर्यंत विधी पाळले जातात त्याचबरोबर 13 दिवसांपर्यंत विशेष धार्मिक विधीही पाळले जातात. पण तुम्हाला माहितीये का की या परंपरांमागे धार्मिक, वैज्ञानिक कारणंही (Scientific Reasons) आहेत. जेव्हा आपल्या घरातील मृत व्यक्तीची अंतयात्रा स्मशानभूमीच्या ठिकाणी जायला निघते तेव्हा या व्यक्तीचे नातेवाईक हातात भांडे घेऊन त्या व्यक्तीच्या मृतदेहावरून चालतात ज्या भांड्यात धुरकट कांडा ठवलेला असतो. पातळ दोरीनं बांधलेल्या मातीच्या भांड्यात आग लावली जाते. 

काय आहे कारणं? 

असं म्हणतात की जून्या काळी ज्या अग्नीभोवती वधू-वर (Saptpadi) फेऱ्या मारत होते त्याच अग्नीचा वापर घरातील गोष्टींसाठीही केला जाई. या अग्नीचा उपयोग घर, यज्ञ, पूजा इत्यादींसाठी केला जात होता. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही या अग्नीनेच अंत्यसंस्कार केले जात होते. त्यावेळी ही परंपरा होती. त्याच परंपरेचा एक भाग म्हणून आजही घरातून आपल्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर आजही अग्नी प्रज्वलित करून मटक्यामध्ये स्मशानभूमीत नेले जाते आणि त्या मृतांवर अत्यंसंस्कार केले जातात. पातळ दोरीने बांधलेल्या मातीच्या भांड्यात आग घेऊन मृत व्यक्तीच्या भोवती का चाललं जातं आणि त्यातून निघणारा धूर असं चित्रं तुम्ही हिंदू अंत्ययात्रेत पाहिले असेलच.

हेही वाचा - धक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही..

हे भांडे हातात धरून मृताचे नातेवाईक अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालतात. त्यानंतर स्मशानभूमीत (Cremeted) पोहोचल्यानंतर या मातीच्या भांड्याला गवतावर ठेवून अग्नी प्रज्वलित केला जातो आणि त्याद्वारे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. म्हणजेच घरातून आणलेल्या या आगीत मृताचा मृतदेह जाळला जातो.  ही परंपरा गेली अनेक वर्ष हिंदू धर्मात आहे. यावेळी पांढऱ्या कपड्यांना परिधान केले जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)