देशात आधी १ रुपया चांदीचा होता...पण या अडचणीमुळे १ रूपयाची कागदी नोट आली

तुम्ही कधी तुमच्या जवळ असलेल्या नोटांना निट पाहिले आहे का? त्याच्यावर काय काय लिहिले असते?

Updated: Jun 10, 2021, 06:17 PM IST
देशात आधी १ रुपया चांदीचा होता...पण या अडचणीमुळे १ रूपयाची कागदी नोट आली

मुंबई : पैसे हे आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठीच आपण मेहनत करतो आणि पैसे कमावतो. परंतु तुम्ही कधी तुमच्या जवळ असलेल्या नोटांना निट पाहिले आहे का? त्याच्यावर काय काय लिहिले असते? त्या नोटींवरती किती भाषा लिहिलेस्या आहेत ते? तर आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.

नोटवर 17 भाषा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट नुसार एका नोटीवर 17 भाषा छापल्या आहेत. इंग्रजी आणि हिंदी भाषा नोटीच्या समोरच्या बाजूला छापलेल्या आहेत. तर उरलेल्या 15 भाषा नोटीची उलट म्हणजे मागच्या बाजूने छापल्या आहेत. भारतीय राज्यघटनेत कोणत्याही भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळालेला नाही आणि आपल्या देशात २२ भाषा बोलल्या जातात. अशा परिस्थितीत या सर्व भाषांना नोटीवर प्राधान्य देण्यात आले आहे.

नोटीवर ज्या भाषा छापल्या आहेत त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजीशिवाय आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्यालम, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश आहे. त्याचबरोबर 2 हजार रुपयांच्या नोटेवर ब्रेल लिपी देखील छापली आहे. जेणेकरुन जे लोक पाहू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही नोट ओळखण्यास मदत होते.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक बनला. सध्याच्या भारतातील एक रुपयाचे डिझाइन आजच्या एका रुपयाच्या नाण्याने प्रभावित आहे. नोटसाठी छापण्यात आलेले प्रतीक हे सारनाथ येथील चार-तोंडाच्या सिंहाकडून घेण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वतंत्र भारतातील पहिली नोट ही एक रुपयाची नोट होती.  30 नोव्हेंबर 1917 रोजी ब्रिटीशांच्या कारकीर्दीत एक रुपयाची नोट आली.

पहिल्या महायुद्धात ब्रिटीशांचे वर्चस्व होते आणि त्यावेळी चांदीची नाणी म्हणून एक रुपयाची नाणी प्रचलित होती. परंतु जेव्हा युद्धामुळे परिस्थिती अधिकच बिघडली, तेव्हा चांदीची नाणी तयार करणे कठीण झाले. यामुळे, पहिल्यांदाच लोकांसमोर एक रुपयाची नोट आली, त्यावर जॉर्ज पंचमचे फोटो ठेवण्यात आला. ही नोट इंग्लंडमध्ये छापली गेली होती आणि उर्वरित चलनाच्या तुलनेत एक रुपयाच्या नोटची किंमत खूप कमी होती.

हैदराबादच्या निजामला स्वतःचे चलन वापरण्याचा अधिकार देण्यात आला

1969 मध्ये आरबीआयने महात्मा गांधी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त 5 आणि 10 रुपयांच्या नोटांवर स्मारक डिझाइनची सीरिज जारी केल्या होत्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चालत्या बोटीचा फोटो 40 वर्षाहून अधिक काळ 10 रुपयांच्या नोटांवर होता.

सन 1959 मध्ये सौदी अरेबियाच्या स्थानिक चलनानुसार यात्रेकरूंची देवाणघेवाण व्हावी म्हणून भारतातील हज यात्रेकरुंसाठी 10 आणि 100 रुपयांच्या विशेष नोटा दिल्या गेल्या.  1917-1918 मध्ये हैदराबादच्या निजामला स्वतःचे चलन मुद्रित करण्याचा आणि देण्याचा अधिकार देण्यात आला.