HMPV Virus Outbreak in India: चीनने शुक्रवारी फ्लूचा उद्रेक झाल्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण जाहिर केले आहे. तसेच परदेशी लोकांसाठी आपल्या देशात म्हणजे चीनमध्ये प्रवास करणे किती सुरुक्षित असल्याचे आपल्या अधिकृत माहितीमध्ये म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हिवाळ्याच्या काळात श्वासोच्छवासाचे संसर्ग सामान्य असतात परंतु यावर्षी HMPV या आजाराने थैमान मांडला आहे. HMPV हा आजार किती गंभीर आहे, हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "उत्तर गोलार्धात हिवाळ्याच्या काळात श्वसन संक्रमणाचे प्रमाण जास्त असते." सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये गर्दीने भरलेली रुग्णालये दिसत आहेत. परंतु HMPV हा व्हायरस आधीच्या रोगाच्या तुलनेतकमी तीव्र आणि कमी प्रमाणात पसरलेला दिसत आहे. त्यामुळे हा आजार सामान्य असल्याचं सांगण्यात येत आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले की, चीनला जाणे सुरक्षित आहे. "मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की चीन सरकारला चीनमधील चिनी नागरिक आणि परदेशी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. चीनमध्ये प्रवास करणे सुरक्षित आहे," असं त्यांनी यावेळी सांगितले. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हिवाळ्याच्या हंगामात अशा संसर्गजन्य आजारांचा उद्रेक ही वार्षिक घटना आहे.
(हे पण वाचा - HMPV ची भारतात एन्ट्री; बंगळुरुतील 3 आणि 8 महिन्यांच्या दोन चिमुकलींना लागण)
चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
इन्फ्लूएन्झा सारख्या आजार (ILI) आणि इन्फ्लूएंझासाठी गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) साठी एक मजबूत पाळत ठेवणारी यंत्रणा भारतात अस्तित्वात आहे. ICMR आणि IDSP दोन्ही नेटवर्कद्वारे भारतात आधीच ऍक्टिव मोडवर सज्ज आहेत. दोन्हीकडील डेटा ILI आणि SARI प्रकरणांमध्ये कोणतीही असामान्य वाढ दर्शवत नाही.
रूग्णालयातील डॉक्टरांनी देखील पुष्टी केली की अपेक्षित हंगामी भिन्नता व्यतिरिक्त गेल्या काही आठवड्यांमध्ये श्वसनाच्या आजाराच्या प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.
ICMR नेटवर्क इतर श्वसन विषाणू जसे की Adenovirus, RSV, HMPV इत्यादींसाठी देखील चाचणी करते आणि हे रोगजनक देखील चाचणी केलेल्या नमुन्यांमध्ये असामान्य वाढ दर्शवत नाहीत.
सावधगिरीचा उपाय म्हणून, ICMR द्वारे HMPV चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाईल आणि ICMR संपूर्ण वर्षभर HMPV च्या ट्रेंडचे निरीक्षण करेल.
दरम्यान, भारताच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) ने सांगितले की, ते देशातील श्वसन आणि मौसमी आजारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि मानवी मेटापन्यूमोव्हायरसच्या (HMPV) अहवालांवर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, "आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत राहू आणि त्यानुसार माहिती आणि घडामोडींबाबत वेळोवेळी अपडेट करत राहू." तसेच आरोग्य सेवांचे महासंचालक (DGHS) डॉ. अतुल गोयल म्हणाले की, ह्युमन मेटाप्युमोव्हायरस हा इतर श्वसनाच्या विषाणूंसारखा आहे ज्यामुळे सामान्य सर्दी होते.
"चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) उद्रेक झाल्याबद्दल बातम्या येत आहेत. आम्ही भारतातील श्वसन उद्रेकांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे आणि डिसेंबर 2024 च्या डेटामध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही आणि अशी कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत. आमच्या कोणत्याही संस्थांकडून रुग्णांच्या मोठ्या संख्येची नोंद झालेली नाही. सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही.