Rajnath Singh Dance Video: राजनाथ सिंग यांचा हात पकडून अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांचा बेभान डान्स, Video व्हायरल

Rajnath Singh Dance Video: देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी दिल्लीमधील आपल्या निवासस्थानी होळी (Holi) साजरी केली. यावेळी अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. राजनाथ सिंग यांनी होळी साजरी करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामला शेअर केला असून यामध्ये जीना रायमोंडो (United States Secretary of CommerceGina Raimondo) त्यांचा हा पकडून नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.   

Updated: Mar 8, 2023, 05:15 PM IST
Rajnath Singh Dance Video: राजनाथ सिंग यांचा हात पकडून अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांचा बेभान डान्स, Video व्हायरल title=

Rajnath Singh Dance Video: मंळवारी संपूर्ण देशभरात होळी साजरी करण्यात आली. राजकीय नेत्यांकडूनही आपल्या निवासस्थानी होळीचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीदेखील आपल्या दिल्लीमधील निवासस्थानी होळी साजरी केली. यावेळी विदेशी पाहुण्यांनीही राजनाथ सिंग यांच्यासह रंगाची उधळण करत सण साजरा केला. अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांनी यावेळी राजनाथ सिंग यांच्यासह डान्सही केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 5 हजारापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. 

राजनाथ सिंग यांनी आपल्या निवासस्थानी होळी साजरी करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात केंद्रातील कायदा मंत्री, क्रीडा मंत्री यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांनाही होळी साजरी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत रंगांची उधळण केली. 

राजनाथ सिंग यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो राजनाथ सिंग यांचा हात पकडून बेभान डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्या राजनाथ सिंग यांच्या कानात काहीतरी सांगतानाही दिसत आहे. यानंतर दोघेही जोरात हसतात. "माझ्या अधिकृत निवासस्थानी होळीच्या शुभ मुहूर्तावर अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांचे यजमानपद भूषवताना आनंद होत आहे," अशी कॅप्शन राजनाथ सिंग यांनी दिली आहे. 

 जीना रायमोंडो यांनी या कार्यक्रमानंतर ANI शी संवाद साधला. यामध्ये त्यांनी अशाप्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होणं आपल्यासाठी सन्मान असल्याचं सांगितलं. तसंच मंत्री महोदयांनी माझा चांगला सन्मान केला असून, हा छान सण आहे असंही त्या म्हणाल्या.