हनीप्रीतच्या ड्रायव्हरला राजस्थानातून अटक

बेपत्ता असलेली गुरमीत राम रहीमची मानलेली मुलगी गुरमीतच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलीये. हनीप्रीतचा ड्रायव्हर प्रदीपला राजस्थान पोलिसांनी सिरसा पोलिसांच्या मदतीने अटक केली.

Updated: Sep 15, 2017, 04:52 PM IST
हनीप्रीतच्या ड्रायव्हरला राजस्थानातून अटक title=

पंचकुला : बेपत्ता असलेली गुरमीत राम रहीमची मानलेली मुलगी गुरमीतच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलीये. हनीप्रीतचा ड्रायव्हर प्रदीपला राजस्थान पोलिसांनी सिरसा पोलिसांच्या मदतीने अटक केली.

पंचकुलाचे डीसीपी मनवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला ड्रायव्हर प्रदीपला पंचकुलाला आणण्याचा कोणताही विचार नाही. सध्या सिरसा पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. 

याआधी पंचकुलामध्ये हिंसा पसरवण्याप्रकरणी आरोपी डेरा प्रवक्त दिलावर सिंहला सोनीपतच्या गोहना येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलाय.