मुंबई : आपण कुठेही फिरायला गेलो की, हॉटेलमध्ये राहातो. परंतु येथे राहायला जाताना आपण त्यासंदर्भात अनेक गोष्टी इंटरनेटवर चेक करतो. त्यांपैकी सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे पैसे. त्यानंतर लोक हॉटेलचे रुम, एमिनिटीज, हॉटेलचं लोकेशन आणि सेवा पाहून हॉटेल बुक करतात. परंतु आज आम्ही तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याला लक्षात घेऊन तुम्ही हॉटेलचं रुम बुक केलं पाहिजे.
हे नेहमी लक्षात ठेवा की अनेक हॉटेल्स बहुमजली असतात. परंतु या हॉटेल्सच्या तळमजल्यावर तसेच चौथ्या मजल्यावर कधीही रुम घेऊ नका. आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की असं का? (Hotel Booking Tips)
खरंतर प्रवासी जोखीम तज्ञांकडून हे सांगण्यात आलं आहे की, हॉटेलच्या तळमजल्यावर आणि चौथ्या मजल्यावर कधीही रुम घेऊ नका.
'द सन'च्या वृत्तानुसार, लॉयड फिगिन्स हे माजी सैनिक आहेत आणि आता प्रवासी जोखीम तज्ञ म्हणून काम करतात. त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला आहे. यादरम्यान, त्याने विविध देशांच्या हॉटेल्समधील सुरक्षेचे बारकाईने निरीक्षण केले आहे आणि त्यांच्या अभ्यासावर त्यांनी हा दावा केला आहे आणि रूम बुकिंगशी संबंधित सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (Hotel Booking Tips)
यासाठी त्यांनी कारणं देखील दिली आहेत, चला ती कारणं कोणती आहेत हे जाणून घेऊ या.
लॉयड फिगिन्सच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही हॉटेलमध्ये रूम बुक करत असाल, तर ती चौथ्या मजल्यावर करु नका, कारण बहुतेक हॉटेल्समध्ये सुरक्षा आणि सुरक्षेबाबत निष्काळजीपणा दिसून आला आहे. विशेषत: अग्निसुरक्षेच्या संदर्भात.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही चौथ्या मजल्यावर खोली बुक केली आणि अचानक आग लागली, तर तुम्ही त्यात अडकू शकता. अशा परिस्थितीत पायऱ्यांवरून खाली उतरायचे असेल तर तेही सहज शक्य नाही. त्यामुळे तुमची सुरक्षितता लक्षात घेता दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर खोल्या घेणं चांगले. कारण इथून बाहेर निघण्याची संभाव्यता जास्त आहे.
लॉयड फिगिन्स यांनी याचं देखील कारण स्पष्ट केलं आहे. हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा असते, पण असे असतानाही तेथे चोरीच्या घटना घडतात, असे त्यांचे म्हणणे आहे. असे चोर अनेकदा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने हॉटेलच्या रेस्टॉरंट, रिसेप्शन किंवा मीटिंग एरियामध्ये उपस्थित असतात. तिथून त्यांना कल्पना येते की कोणता ग्राहक श्रीमंत आहे आणि तो कोणत्या मजल्यावर राहतो. (Hotel Booking Tips)
तळमजल्यावरील खोल्यांमधूने चोरणे आणि पळून जाणे चोरांसाठी सोपं आहे. तसेच वरच्या मजल्यावर चोरी करून सामानासह निघून गेल्यावर पकडले जाण्याची भीती आहे. त्यामुळे ते अनेकदा वर चढणे टाळतात. त्यामुळे त्या खोल्या सहसा सुरक्षित राहतात.
आता तुम्हाला तळमजल्यावर किंवा चौथ्या मजल्यावरच्या हॉटेलमध्ये खोल्या का बुक करू नयेत, याचं कारण लक्षात आलंच असेल.