Narco Test : तेलगी, कसाब आणि आता आफताब...; कोर्टाच्या परवानगीने होणारी नार्को टेस्ट म्हणजे काय?

Sharda Walker Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची सोमवारी नार्को टेस्ट होऊ शकते. दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात ही चाचणी केली जाणार आहे. 

Updated: Nov 20, 2022, 01:47 PM IST
Narco Test : तेलगी, कसाब आणि आता आफताब...; कोर्टाच्या परवानगीने होणारी नार्को टेस्ट म्हणजे काय? title=

Sharda Walker Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलय. आफताब पूनावालाने (aftab poonawalla) श्रद्धाची हत्या करत तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासानंतर आफताबबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या आणखी खोलात जाण्यासाठी आफताबची नार्को टेस्ट (Narco test) करण्याचे ठरवले आहे. (How criminal start telling the truth in Narco Test)

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची सोमवारी नार्को टेस्ट होऊ शकते. दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात ही चाचणी केली जाणार आहे. न्यायालयाने पोलिसांना आरोपी पूनावालाची पाच दिवसांत नार्को टेस्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पूनावाला याच्याविरुद्ध कोणताही थर्ड डिग्री उपाय वापरता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पण नार्को टेस्ट म्हणजे काय (What is Narco Test) आणि ती कशी होते?

नार्को चाचणी गुन्हेगार किंवा आरोपी व्यक्तीकडून गुन्ह्याबाबत विस्तृत माहिती घेण्यासाठी केली जाते. या चाचणीत सत्य बाहेर येण्याची पूर्ण शक्यता असल्याचेही म्हटले जाते.

कशी होते नार्को टेस्ट?

नार्को टेस्टमध्ये गुन्हेगाराला काही औषधे दिली जातात ज्यामुळे त्या व्यक्तीचे सक्रिय मन पूर्णपणे सुस्त होते. या चाचणीत माणसाचे मन पूर्णपणे सुस्त होते. ज्यानंतर व्यक्तीचे तार्किक कौशल्य थोडे कमी होते आणि तो जाणुनबुजून किंवा विचार करुन गोष्टी सांगू शकत नाही.

या चाचणीत व्यक्तीला ट्रुथ सीरम इंजेक्शन (Truth Drug) दिले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या या चाचणीसाठी सोडियम पेंटोथल (sodium pentothal), स्कोपोलामाइन आणि सोडियम एमायटल ही औषधे दिली जातात. या दरम्यान, मॉलिक्युलर लेवलवर  एखाद्या व्यक्तीच्या मज्जासंस्थेमध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकतो. त्यामुळे माणूस स्वाभाविकपणे खरे बोलू लागतो.

चाचणी नेमकी कशी होते?

तपास अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ञ यांच्या उपस्थितीत नार्को टेस्ट केली जाते. यादरम्यान तपास अधिकारी आरोपींना प्रश्न विचारतात आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते. नार्को टेस्टसाठी सायकोएक्टिव्ह औषध दिले जाते. औषध रक्तात पोहोचताच आरोपी थोडा फारच शुद्धीच असतो. 

स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी आणि मुंबई हल्ल्याचा दहशतवादी अजमल अमीर कसाब यांच्या नार्को टेस्ट करण्यात आली होती. त्यामुळे आता या चाचणीतून श्रद्धा हत्याकांडातही पुरावे मिळण्याची आशा आहे.