ओमायक्रॉन किती धोकादायक, दोन आठवड्यात स्पष्ट; महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह

ओमायक्रॉन (Omicron) प्रसाराच्या वेगाबाबत येत्या दोन आठवड्यात स्पष्टता होईल. ओमायक्रॉन किती धोकादायक हेही समजणार आहे.

Updated: Dec 11, 2021, 02:24 PM IST
ओमायक्रॉन किती धोकादायक, दोन आठवड्यात स्पष्ट; महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह title=
संग्रहित छाया

मुंबई : ओमायक्रॉन (Omicron) प्रसाराच्या वेगाबाबत येत्या दोन आठवड्यात स्पष्टता होईल. ओमायक्रॉन किती धोकादायक आहे, किती वेगाने पसरतोय याबाबत दोन आठवड्यात माहिती समोर येणार आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी धोकादायक आहे. मात्र, हा डेल्टा पेक्षा खूप वेगाने पसरतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Omicron : 36 प्रयोगशाळा सज्ज 

कोरोनानंतर जगात संसर्ग होत असलेल्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची चाचणी करण्यासाठी देशात 36 प्रयोगशाळा सज्ज झाल्या आहेत. यात एकाच दिवशी 30 हजार नमुन्यांची तपासणी होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

Omicronमुळे देश डेंझर झोनमध्ये

ओमायक्रॉनमुळे देश डेंझर झोनमध्ये आहे अशी चिंता टास्क फोर्सने व्यक्त केलीय. बेपर्वाईमुळेच ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतायत, असं निरिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. देशभरात ओमायक्रॉनचे 32रुग्ण आढळले आहेत. निती आयोगाचे सदस्य आणि टास्क फोर्स प्रमुख व्हीके पॉल यांनी चिंता व्यक्त केली आहे.  

महाराष्ट्रात आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाण्यात दुबईहून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. या 55 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाचा स्वॅब ओमायक्रॉनच्या (Omicron) तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आला असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

सौदी अरेबियातून आलेल्या व्यक्तिच्या अहवाल कोरोना पोझिटिव्ह निघाल्याने भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संबधित व्यक्तिवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. संबधित व्यक्तिची Omicron चाचणी करून त्याचे सॅम्पल पुण्यातील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

मालेगावात आरोग्य यंत्रणा सज्ज 

मालेगावमध्ये कोरोना नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात 200 बेडचे कोरोना कक्ष सुरू करण्यात आलेत. तसंच 20 हजार केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक, ऑक्सिजन प्लान्ट ,12 ड्युरा सिलिंडर ,140  जम्बो सिलिंडर सज्ज ठेवण्यात आलेत. 12 बेडचे बाल कक्षही उभारण्यात आले आहे.

लस नाही तर पगारही नाही!

गोंदियात लस घेतल्याशिवाय पगार मिळणार नाही,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. जिल्हाधिका-यांच्या या आदेशांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हाधिका-यांनी हा आदेश काढला आहे.