Aadhar Update | आधार कार्डमध्ये कितीवेळा करू शकता अपडेट; जाणून घ्या नवीन नियम

आधार कार्डमध्ये वयक्तिक माहिती, जसे की, नाव, पत्ता, लिंग आणि जन्माची तारीख चुकीची नोंदवली गेल्यास तुम्ही ती माहिती एडिट करून अपडेट करू शकता.

Updated: Oct 29, 2021, 12:14 PM IST
Aadhar Update | आधार कार्डमध्ये कितीवेळा करू शकता अपडेट; जाणून घ्या नवीन नियम title=

मुंबई :आधार कार्डमध्ये वयक्तिक माहिती, जसे की, नाव, पत्ता, लिंग आणि जन्माची तारीख चुकीची नोंदवली गेल्यास तुम्ही ती माहिती एडिट करून अपडेट करू शकता. परंतु आधारमध्ये ही माहिती कितीवेळा एडिट केली जाऊ शकते. त्यासंबधीच्या नियमांबाबत जाणून घेऊया

आधार कार्डवरील छोट्या मोठ्या चुकांमुळे अनेक कामांमध्ये अडचणी निर्माण होतात. यामध्ये पीएम किसान योजनेचा हफ्ता देखील थांबूल शकतो. बँकेत खाते सुरू करताना चुकीच्या स्पेलिंगने खाते सुरू होऊ शकते. परंतु या सर्व अडचणींना दुर करता येऊ शकते. कारण तुमची जन्म तारीख, नाव, पत्ता इत्यादी अपडेट करता येऊ शकते. परंतु यातील काही महत्वाचे नियम-शर्थी समजून घेणे महत्वाचे असते.

किती वेळा करता येते अपडेट
नाव - फक्त दोन वेळा
लिंग - फक्त एकदा
जन्म तारीख - फक्त एकदा

असे असणार अपडेट 
जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्म तारीख किंवा लिंगामध्ये नोंदणीवेळी काही त्रुटी राहिल्या असतील तर, अपडेट करता येते. जर तुम्ही अपडेटची मर्यादा पूर्ण केली असेल तर, तुम्हाला UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयात ईमेल किंवा डाकच्या माध्यमातून नामांकन केंद्रावर अपडेट स्विकार करण्यासाठी अर्ज करणे गरजेचे असते. URN स्लिपची एक कॉपी, आधार डिटेल्स आणि एडिट डिटेलशी संबधित डॉक्युमेंट सुद्धा असायला हवे. या डिटेल्ससह तुमचा अर्ज help@uidai.gov.in वर पाठवू शकता.

आधारच्या क्षेत्रीय कार्यालकाकडून तुम्हाला मेल येईल. तुम्हाला तेथे बोलवू शकतात. त्यानंतर आधार अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.