आता घरबसल्या Ration Cardमध्ये नाव जोडता येणार, कसं ते जाणून घ्या

शिधापत्रिकेच्या कार्यालयात न जाता,ऑनलाईन नाव कसं जोडायचं, हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. 

Updated: Jun 19, 2021, 05:41 PM IST
आता घरबसल्या  Ration Cardमध्ये नाव जोडता येणार, कसं ते जाणून घ्या

मुंबई : रॅशन कार्डावर ( Ration Card) कुटुंबातील नव्या सदस्याचे  नाव जोडण्यासाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागतात. पण हे काम घरबसल्या ऑनलाईनही करता येऊ शकतं. घरात सून तसेच मुलाचं आगमन झाल्यावर या सदस्यांचं नाव शिधापत्रिकेत जोडावं लागतं. हेच काम शिधापत्रिकेच्या कार्यालयात न जाता,ऑनलाईन कसं जोडायचं, हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. (How to add name online in ration card know process)
 
रॅशन कार्डात सूनेचं नाव जोडण्यासाठी आधार कार्डात आवश्यक त्या बांबीमध्ये विशेष करुन नावात बदल करुन घ्यावं लागेल. तसेच एड्रेसमध्ये बदल करावा लागेल. यानंतर अपडेटेड आधार कार्डची झेरॉक्स अर्जासह संबंधित अधिकाऱ्याला द्यावी लागेल. 

लहान मुलाचं नाव रॅशन कार्डात जोडून घेण्यासाठी आधी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्डसाठी त्या मुलाचा जन्माचा दाखला आवश्यक असेल. त्यामुळे जन्मानंतरच्या काही दिवसांनी तातडीने जन्म प्रमाणपत्र बनवून घ्यायला हवं. 

ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या

यासाठी तुम्हाला राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर त्या वेबसाईटवर नाव जोडण्यासह अनेक पर्याय दिसतील.  वेबसाईटमध्ये लॉगीन करण्यासाठी आयडी तयार करावा लागेल. त्या आयडीने लॉगीन केल्यानंतर होम पेज दिसेल.

या होमपेजवर नवीन सदस्याचं नाव जोडण्याचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर अर्ज उघडेल. या अर्जात विचारलेल्या सर्व माहिती अचूक द्यावी लागेल. या अर्जासह तुम्हाला आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील. 

अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. तुम्ही पाठवलेले कागदपत्र आणि अर्जाची तपासणी अधिकाऱ्यांकडून केली  जाईल. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून अर्ज स्वीकारला जाईल. त्यानंतर तुम्हाला आवश्यक ते बदल करुन पोस्टाद्वारे अपडेटेड रॅशन कार्ड पाठवण्यात येईल. 

संबंधित बातम्या : 

नवा कामगार कायदा : आठवड्याला 5 दिवसांऐवजी फक्त 4 दिवस करा काम, 3 दिवसांची सुट्टी

PM SYM : फक्त 55 रुपये महिना जमा करा; 36 हजार रुपये पेंशन मिळवा. येथे करा अप्लाय

रेशन कार्ड - आधार कार्ड जोडणी केली नाही तर रेशन मिळणे कठीण