या राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे संपला, मंत्रिमंडळ बैठकीत 'अनलॉक' करण्याचा निर्णय

कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. 

Updated: Jun 19, 2021, 04:42 PM IST
या राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे संपला, मंत्रिमंडळ बैठकीत 'अनलॉक' करण्याचा निर्णय

मुंबई : कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता दिलासा मिळत आहे. अनेक ठिकाणी आणि काही राज्यात निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे. आता दक्षिणेकडील तेलंगणा राज्यात लॉकडाऊन (lockdown) पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. अर्थात आतापर्यंत लागू असलेले निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत  'अनलॉक'चा (Unlock) निर्णय घेण्यात आला. (lift lockdown completely)

केंद्राने इशारा दिला

दरम्यान, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतर हळूहळू बाजारपेठा आणि इतर कामे अनलॉक खाली सुरु केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इशारा दिला आहे की, अद्याप कोठेही हलगर्जीपणा करु नये जेणेकरून कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागेल.

'कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे'

केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी कोविड प्रोटोकॉल  (Covid Protocol) पूर्ण तत्परतेने राबविण्यात यावा. तसेच जिल्हा पातळीवर प्रयत्न, मागोवा, उपचारांचे सरकारचे धोरण तातडीने राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, 'बंदी लागू करण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय तेथील परिस्थितीच्या आकलनाच्या आधारे घेतला गेला पाहिजे.