Stand Up India Loan Scheme: स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल आवश्यक असतं. त्यामुळे अनेक जण कर्जासाठी वणवण हिंडतात. बँकांचे उंबरठे झिजवून अनेकदा हाती काहीच लागत नाही. जर तुम्हाला बिझनेस सुरु करण्यासाठी भांडवल हवं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार 10 लाख ते 1 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकते. देशातील नवोदीत व्यावसायिकांना पाठबळ देण्याासाठी Stand Up India Scheme सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात. योजनेंतर्गत देशभरातील बँकांना सरासरी एका SC/ST वर्गाला आणि एका महिलेला हे कर्ज द्यायचे आहे. या कर्ज योजनेबद्दल जाणून घेऊया.
या योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज दाखल करू शकता. तुम्हाला 10 लाख ते 1 कोटीपर्यंत भांडवल मिळू शकतं. कर्ज फेडण्याचा कालावधी सात वर्षे इतका आहे. त्याचबरोबर 18 महिन्याचा मोरेटोरियम पिरियड मिळतो. यातून क्रेडिट विथड्रॉल करण्यासाठी RuPay डेबिट कार्ड दिलं जातं. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी बँक ब्रांच किंवा लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर किंवा स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया पोर्टलवर अर्ज करू शकता.
बातमी वाचा- UPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा
बातमी वाचा- Credit Card: सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कसे निवडाल? हे सात प्रश्न करतील मदत